Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पश्चिम बंगालमध्ये दोन मालगाड्यांची टक्कर, 12 डबे रुळावरून घसरले

पश्चिम बंगालमध्ये दोन मालगाड्यांची टक्कर, 12 डबे रुळावरून घसरले


पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे भीषण रेल्वे अपघात झाला आहे. या ठिकाणी दोन मालगाड्या एकमेकांना धडकल्या. या अपघातानंतर किमान 12 डबे रुळावरून घसरले. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास ओंडा स्थानकाजवळ हा अपघात झाला. या अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. एका मालगाडीने दुसऱ्या मालगाडीला मागून धडक दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

अलीकडेच बालासोर येथे रेल्वे अपघात झाला होता ज्यात सुमारे 300 लोकांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा दोन मालगाड्यांचा अपघात झाल्याने रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. पश्चिम बंगालमधील बांकुरा येथे दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे आता रेल्वे प्रवासाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न उभे राहिले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.