Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माधवनगर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल 10 जूनपासून बंद..

माधवनगर रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल 10 जूनपासून बंद..


सांगली: रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे सांगली माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर येथील रेल्वे पूल पाडण्यात येणार आहे. हा पूल रुंद करण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल 10 जूनपासून रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 10 जानेवारी 2024 पर्यंत हा पूल रहदारीसाठी बंद राहील अशी अधिसूचना प्रभारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केली आहे.

चिंतामणीनगर येथील रेल्वे पूल 503 चे रुंदीकरण करण्यासाठी तो पाडण्यात येणार आहे. लवकरच त्याचे बांधकाम सुरु होणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक वळवण्यासाठी उपविभागीय अधिकारी मिरज व वाहतूक नियंत्रण शाखा सांगली यांनी पर्यायी वाहतूक मार्गाचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे आता या पुलावरून होणारी वाहतूक 10 जून 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीसाठी अन्य मार्गावरून वळविणेत येणार आहे.

सांगलीतून तासगावकडे जाण्यासाठी मार्ग

कॉलेज कॉर्नर चौक माधवनगर रस्ता, पट्टणशेट्टी होंडा शोरूम कॉर्नरवरुन बायपास रस्ता, जुना बुधगाव रस्ता समाजकल्याण कार्यालयाकडे जाणारा रस्ता, पंचशीलनगर, लक्ष्मीनगरमार्गे माधवनगर जकात नाक्यापर्यंत जाऊन तासगाव, विटा शहराकडे जाता व येता येईल.

तासगावकडून सांगलीत शहरात जाण्याचा मार्ग 

माधवनगर रस्ता, साखर कारखाना चौक, संपत चौकातून औद्योगिक वसाहत मार्गे संजयनगर 100 फुटी रस्ता, अहिल्यादेवी होळकर चौकातुन उजवीकडे पश्चिमेकडे शिंदे मळा रेल्वेपुला खालुन सांगलीत येता व जाता येईल. तसेच अहिल्यादेवी होळकर चौकातुन डावीकडे पुर्वेस वळण घेवून कुपवाड रस्ता, मंगळवार बाजार चौक गांधी कॉलनी सह्याद्रीनगर उड्डाणपूल मार्गे शहरात व इतर ठिकाणी जाता व येता येईल. या अधिसूचनेनुसार वाहतूक मार्गातील बदलाचे फलक संबंधित ठिकाणी लावण्यात येणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.