जुगार अड्ड्यावर छापा, 1 कोटी 8 लाखांचा मुद्देमाल जप्त; 81 आरोपींना अटक
शेगाव (जि. बुलढाणा) : शहरातील गौरव बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या जुगारावर अमरावती विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने शनिवारी उशीरा छापा टाकला. यामध्ये विविध जिल्ह्यातील ८१ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ११९ मोबाईल, ३८ दुचाकी वाहने व इतर मुद्देमालासह १ कोटी ८ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपरोक्त कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद सुळ रा.शेगाव, सचिन वाघमारे रा. अकोट, गोपाल बोरडे रा.बाळापूर, विष्णू वाघ रा. मलकापूर, संदीप टोपरे रा. अकोला, गणेश चव्हाण रा. सोनाळा, मो. असिफ मो. हनिफ रा. नांदुरा, अ. अकिल अ. रज्जाक रा. चिखली, श्याम भोवरे रा. घाटपुरी, संतोष पाटील रा. बाळापूर, रमेश अंबुसकर रा. उमरखेड ता. शेगाव, भास्कर पाटील रा. विष्णूवाडी ता. मलकापूर, विजय पाडीया रा. शेगाव, गणेश इंगळे रा. सवर्णा, सुमित काटे रा. मोताळा, विवेक मुंदडा रा. अकोला, महेंद्र तायडे रा. अकोला, समाधान खंडेराव रा. कौलखेड, प्रदीप मधुकर पोसरकर रा. शेगाव, नीलेश ठाकूर रा. तेल्हारा, योगेश वाघ रा. सगोडा, गजानन राठोड रा. घाटपुरी, शेख मिर्झा शेख मोहम्मद रा. उजमपुरा, अजहर खान जाकर खान रा. बैदपुरा, जाकिर शाह मदार शाह रा. तेल्हारा, राजू मोरे रा. सायवली, अफजल खान फिरोज खान रा. बैदपुरा, दीपक वानखडे रा. उमरी, शकील मुल्ला गणी मुल्ला रा. तेल्हारा, सुरज दामोधरे रा. आवट, गौतम तायडे रा. आडसुळ, सागर दामोधर रा. एकलारा बानोदा, नथ्थुजी पवार रा. शेगाव, शे. रियाज शे, अनिज रा. बाळापूर, विनोद धर्माराज सुळ रा. शेगाव, गजानन चोपडे रा. शेगाव, रामेश्वर इंगळे रा. सवणी, रवींद्र महाजन रा. वाघोद, संतोष दिवाले रा. अकोट, अशोक गायकवाड रा. शेगाव, संजय बढे रा. शेगाव, भरत चावरे रा. अकोट, राजेश भांडे रा. शेगाव, देवकिशन गोहर रा. अकोट, गणेश अवचार रा. चिंचोली, बाळकृष्ण ताले रा. अकोला, शेख हारूण शेख करीम रा. नांदुरा, प्रकाश शेजोळ रा. गौलखेड, संदीप वानखडे रा. एकलाय बानोदा, हुकुमचंद दंडोरे रा. मलकापूर, ओमप्रकाश अग्रवाल रा. शेगाव, शेख इरफान शेख अयुब रा. बजार फैल, राजू काळे रा. ब-हानपूर, भागवत साबे रा. भेंडवळ, बिस्मील्ला खान अखान अकबर खा. रा. शेगाव, पंकज खिराळे रा. अकोला, सागर पतंगे रा. अकोला, साबीर अजीम पटेल रा. लोहारा, रवींंद्र गजानन नेमाडे रा. डोंगरगाव, संजय मांजरे रा. डोंगरगाव, नीलेश घावट रा. लोहारा, नामदेव माने रा. शेगाव, शेख अजीज शेख रफीक रा. अकोला, अमुल ठाकूर रा. वरवट, शेख अरशद शेख दिलदार रा. शेगाव, मयूर भटकर रा. शेगाव, सोपान खिराळे रा. कु-हा काकोडा, तेजस गोतमारे रा. तामगाव, आत्माराम गजानन बावस्कर रा. तरोळा, सुबोध लव्हाळे रा. पिंप्री कवठळ, सचिन पाटील रा. खामगाव, गोपाल ठाकरे रा. हिवराखुर्द, मोहन मुंडे रा. पिंप्री काथरगाव, प्रतापसिंग राठोड रा. शेगाव, प्रविण हिंगणकार रा. कु-हा काकोडा आदींचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.