Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

USKA कराटे स्पोर्ट्स चे नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदकास गवसणी

USKA कराटे स्पोर्ट्स चे नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदकास गवसणी


टीटी बॅडमिंटन हॉल, लांचोर, काठमांडू येथे भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युनिअर काराटे स्पर्धेमध्ये USKA कराटे स्पोर्ट्स च्या 6 विद्यार्थ्यांची भारतीय संघात निवड झाली होती. या कराटे खेळाडूंनी 4 सुवर्णपदकाला गवसणी घालत प्रथम क्रमांक पटकाविला व 2 काश्य पदक जिंकले. या स्पर्धेचे आयोजन नेपाळ शितोरिय कराटे डो असोसिएशन यांनी केले होते. या स्पर्धेमध्ये सुमारे काताज व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेमध्ये विविध वजन गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेले विद्यार्थी खालील प्रमाणे.

1) दीक्षा गावडे

2) रोहन तिकोटी

3) पृथ्वीराज कदम

4) श्रीकांत पाटील (सिनियर गट)

कास्यपदक प्राप्त केलेले विद्यार्थी खालील प्रमाणे.

1) राजेश्वरी तेली

2) हर्षवर्धन मोठे

या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय पंच कोच सेन्साई विजय तिकोटी सर तसेच संस्थेच्या मुख्य प्रशिक्षिका सेम्पाई आशा तिकोटी व अमृता भंडारे यांचे प्रशिक्षण लाभले तर सेन्साई रमेश पिसाळ व सेन्साई अविनाश पाटील याचे प्रोच्छाहन मिळाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.