Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या गुजरातच्या महिलेची सुटका

जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या गुजरातच्या महिलेची सुटका


सांगली : गुजरातमधील अहमदाबाद येथील एका महिलेस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांना ताब्यात घेवून पिडीत महिलेची सुटका करण्यात आली. संशयीतविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम अन्वये विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दलाल, संशयीत महिला आणि उदय प्रकाश शेटे (वय ३८) यांना ताब्यात घेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विजयनगर परिसरातील एका घरात गुजरातमधील अहमदाबाद येथील महिलेकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बोगस ग्राहक पाठवून त्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून पिडीत महिलेची सुटका केली.

पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, सुवर्णा गोडबोले, रुपाली क्षिरसागर, रजनी पाटील, अभिजीत गायकवाड, महेश गायकवाड, संग्राम गायकवाड अनिता गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.