तासगांव मधील जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष एल.डी.म्हेत्रे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा
तासगांव मधील जीवन विकास संस्थेचे अध्यक्ष एल.डी.म्हेत्रे यांचेवर विनयभंगाचा गुन्हा संस्थेतील शिक्षिकेची तक्रार : पगार आणि बदलीबाबत कायदेशीर लढा दिल्याचा राग मनात धरून कृत्य येथील जीवन विकास संस्था या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण धोंडीराम म्हेत्रे यांनी त्याच संस्थेच्या महाराष्ट्ररत्न वी. स. पागे विद्यानिकेतन शाळेतील एका शिक्षिकेचा विनयभंग केलेप्रकरणी तासगांव पोलीस ठाण्यात आय.पी. सी. कलम ५०९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर शिक्षीका मागील १० वर्षांपासून संस्थेच्या शाळेत पूर्णवेळ सेवेत आहे. तिला नियमानुसार पूर्ण वेतन दिले जात नाही. तिला पूर्ण वेतन देणेबाबत शिक्षणाधिकारी यांनी संस्थेस आदेश करून देखील संस्थेने त्या आदेशाचे पालन केलेले नाही. तसेच तिची अनुदानीत तुकडीवर बदली करण्यात यावी, असे शासनाने आदेश करून देखील त्याची अंमलबजावणी संस्थेने केलेली नाही.पगार आणि बदली बाबत त्या शिक्षिकेचा संस्थेविरुद्ध कायदेशीर लढा सुरु आहे. या बाबीचा राग मनात धरून एल. डी. म्हेत्रे सूडबुद्धीने वागत आहेत आणि शाळेच्या भर मीटिंग मध्ये वारंवार अपमानास्पद वागणूक देत आहेत, अशी शिक्षिकेने एका वर्षापूर्वी तक्रार देखील केलेली होती. पण त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्यांनी त्रास देणे सुरूच ठेवले.त्यानंतर म्हत्रे यांनी डिसेंबर २०२२ मध्ये पुनःश्च शिक्षिकेला प्राचार्यांच्या केबिन मध्ये बोलावून अपमानास्पद आणि लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य करून विनयभंग केल्याने शिक्षिकेने महाराष्ट्र राज्य महीला आयोग आणि शिक्षणाधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. शिक्षिकेवर झालेल्या अन्यायाबाबत मार्च २०२३ च्या विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न देखील मांडण्यात आलेला होता.
प्रलंबित पगार, बदली, अपमानास्पद वागणूक, विनयभंग इत्यादी बाबत संस्थेचे अध्यक्ष - एल. डी. म्हेत्रे आणि सचिव - सुनील महामुनी यांची, कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ प्रतिबंध अधिनियम,२०१३ च्या कायद्यानुसार जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडून सध्या चौकशी सुरु आहे. शिक्षिकेने पगाराबाबत उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून शिक्षणाधिकारी यांनी हे प्रकरण तासगांव पोलीस ठाण्याकडे वर्ग केले होते. त्यानुसार आज गुन्हा नोंद करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.