शरद पवार यांच्या निवृत्तीची ही पाच कारणे ?
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना बळकटी मिळाली आहे. शरद पवारांच्या ‘लोक माझे सांगाती’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन कार्यक्रमात शरद पवारांनी त्यांचा निर्णय बोलून दाखविला. त्याला उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधही केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्य नेते यावेळी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पण शरद पवारांच्या निर्णयाचे अजित पवार यांनी समर्थन केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, शरद पवार यांनी अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.
दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवारांच्या या निर्णयामागची ५ कारणे समोर आली आहेत.
१. अजित पवार यांच्या फुटीची शक्यता गृहीत धरून पक्षनेतृत्वात बदल केला जातोय.२. राष्ट्रवादीला अजित पवार यांच्या ताब्यात जाण्यापासून रोखणे.३. सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात पक्ष देणे.३. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी ज्येष्ठ नेत्यांची गळती रोखणे.४. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अद्यापही आपलेच नेतृत्व मानत असल्याचे दाखवून देणे.५. वाढते वय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून मी निवृत्त होण्याबाबतचा निर्णय आज घेतला आहे, अशी घोषणा करत राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल, हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ठरवावे, असे आवाहन शरद पवार यांनी आज केले. यावेळी पवार म्हणाले की, आज सकाळीच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेली ६० वर्षांहून अधिक काळ मी राजकारण आणि समाजकारणात मी सक्रिय आहे. यापुढेही मी सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार आहे, असेही ते म्हणाले.
कार्यकर्त्यांचा निर्णयाला विरोध
शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडत असल्याचे जाहीर केले आणि सभागृहातच कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला. शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडू नये, अशी मागणी करत त्यांनी पवारांच्या निवृत्तीला तीव्र विरोध केला. व्यासपीठावर धाव घेत पवारांना गराडा घातला. महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले. काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजित पवारांनी व्यासपीठ सोडण्याचे आवाहन केले. मात्र, कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.