Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवैध व्यवसायिकाकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अवैध व्यवसायिकाकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई 


वर्धा : अवैध व्यवसायिकाकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. पोलिस  अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे प्रकरण जाताच त्यांनी तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केल्याचे आदेश जारी केले. पोलिस अधीक्षकांच्या या दणक्याने पोलिस वर्तुळात चांगलीच  खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राठोड, राकेश इतवारे आणि पवन देशमुख असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे

धीरज राठोड, राकेश इतवारे व पवन देशमुख हे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकात कार्यरत होते. त्यांनी इतवारा परिसरातील आनंदनगर भागातील रहिवासी एका अवैध व्यवसायिकाकडून ३० हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कमही प्राप्त केल्याचा आरोप तिघांवर करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. या कारवाईमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. चौकशीत आणखी काय समोर येते यावर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी रुजू होताच सांगितलं होत की कायदा सर्वांसाठी सारखा आहे. कोणीही गैरकृत्य करू नये. याचाच प्रत्यय अधीक्षकांनी भ्रष्ट तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून दिलाय.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.