कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईलवर जास्त वेळ घालवत असाल तर....
बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली फोन, लॅपटॉप, टॅब्लेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तासनतास स्क्रीन समोर वेळ घालवताना आपण अनेकदा पाहतो. तरूणाईमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. अलीकडे झालेल्या वैद्यकीय अभ्यासानुसार लहान मुले व तरूणाई मोबाईल, टॅब्लेट, टीव्ही समोर भरपूर वेळ घालवतात. अतिरिक्त स्क्रीन टाईम मेंदूच्या मेलाटोनिन आणि डोपामाइनच्या उत्पादन वाढीस कारणीभूत ठरते. रात्री चांगली झोप येण्यासाठी संघर्ष करावा लागतो, लोकांशी संवाद साधताना अडचणी येतात. तसेच त्यांना नैराश्य आणि राग येण्याचे प्रमाण वाढू शकते. जास्त वेळ स्क्रीन समोर घालवल्याने व्हिजन सिंड्रोम व ऑटिझम सारखे आजार होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया काय आहे हा व्हिजन सिंड्रोम.
जास्त वेळ कॉम्प्यूटर, मोबाईल वापरल्याने डोळ्यांना होणारा त्रास, याला व्हिजन सिंड्रोम असे म्हटले जाते. डोळ्यांवर आलेला ताण, व डोळे दुखणे किंवा झोंबणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. नजर कमी होते व चष्मा लागतो. सतत डोळ्यातून पाणी येणे, यासारखी लक्षणे दिसून येतात. याचा त्रास फक्त वृद्धांनाच नाही तर लहान मुलांना देखील होताना दिसून येतो.
कॉम्प्यूटर, टीव्ही, मोबाईल पाहणाऱ्यांनी ही खबरदारी घ्यावी
डोळे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी दर 20 मिनीटांनी 2 मिनिटांसाठी स्क्रीन पासून दूर होऊन पापण्यांची उघड झाप करावी. हा व्यायाम आपण कुठेही करू शकतो. नियमितपणे ज्यांचा स्क्रिन टाइम अधिक असतो त्यांनी डोळ्यांना चष्मा लावावा. रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवावे. शरीराला गरज आहे तेवढे पाणी पिणे. तसेच कडक उन्हामध्ये जाताना डोळ्यांवर गॉगल लावावा. डोळ्यांची उष्णता कमी करण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा काकडी ठेवावी.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.