राज्यातील १४३ पोलिस निरीक्षकांची पदोन्नती राजन सस्ते सांगली आथिर्क गुन्हे शाखेचे उपअधीक्षक
मुंबई : राज्यातील पोलिस निरीक्षकांची बरीच वर्षे रखडलेली पदोन्नती आता देण्यात आली आहे. तब्बल १४३ पोलिस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी पदोन्नती देऊन त्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगलीच्या आथिर्क गुन्हे शाखेच्या उपअधीक्षकपदी राजन सस्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय गोरले कोल्हापूर सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगलीतील तत्कालीन निरीक्षक अनिल चोरमले यांची अंबेजोगाईचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. बाळासाहेब भालचिम यांची सातारा जिल्ह्यातील वाईचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील तत्कालीन निरीक्षक रविंद्र शेळके यांची सातारा मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील तत्कालीन निरीक्षक चंद्रकांत काटकर यांची मुंबईचे सहायक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भगवान पाटील यांची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांचे वाचक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जयकुमार सूयर्वंशी यांची शाहुवाडीचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. सांगलीतील तत्कालीन निरीक्षक शिवाजी आवटे यांची सीआयडी पुणे येथे नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीतील तत्कालीन निरीक्षक युवराज मोहिते यांची बारामतीचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.