राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकविला ; डॉ. संजय साळुंखे
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिह्याने राज्यात पहिला क्रमांक पटकविला आहे. मागील आर्थिक वर्षात जिह्यातील 4492 बालकांवर इतर शस्त्रक्रिया व 215 बालकांवर यशस्वी मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या
बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सातत्य राखण्यात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्या प्रयत्नामुळे राज्यात पहिला क्रमांक मिळाला.
सन 2013 पासून बाल स्वास्थ्य कार्यक्रम राज्यात राबविला जात आहे. कार्यक्रमांतर्गत जिह्यातील 8 लाख बालकांची प्रतिवर्षी आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात येते. बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सांगली जिह्यामध्ये सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये जिह्यातील शासकीय अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, शासकीय, निमशासकीय अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांमधून ते 18 वर्षे वयोगटातील शस्त्र्ाक्रियेस पात्र 215 अत्यंत गुंतागुंतीच्या व खर्चिक हृदय शस्त्र्ाक्रिया तसेच 4492 बालकांवर इतर शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत. राज्य कुटुंब कार्यालय, आरोग्य सेवा, पुणे यांच्याकडून महाराष्ट्रातील एकूण 36 जिह्यांच्या क्रमवारीमध्ये सांगली जिह्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून, कोल्हापूर जिल्हा द्वितीय, सातारा जिल्हा तृतीय स्थानी आहेत.
केंद्र सरकारमार्फत राबविला जाणारा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाकांक्षी व संवेदनशील कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत 0 ते 6 वयोगटातील अंगणवाडी बालकांची तपासणी ही वर्षातून दोन वेळा व शालेय लाभार्थ्यांची तपासणी ही वर्षातून एकदा केली जाते. या तपासणीमधून हृदयरोग बालके तसेच इतर आजारांमध्ये अस्थिव्यंग, कान-नाक-घसा, हर्निया, फायमोसिस, अनडिसेंटेड टेस्टीज सारख्या आजारांसाठी बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. आरोग्य पथकांमार्फत जिह्यातील सर्व शासकीय अंगणवाडय़ांमधील तसेच नगरपालिका व महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील पूर्णतः खासगी शाळा वगळता उर्वरित सर्व जिल्हा परिषद शाळा, शासकीय शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण केली जा
मागील सहा वर्षांत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे व जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमास एक वेगळी उंची देण्याचे काम केले आहे. शासनामार्फत कार्यक्रमाच्या अटी, शर्ती, लाभार्थ्यांची गरज याची सांगड घालून जिह्यातील हजारो गरीब-लाभार्थ्यांना आवश्यक असणारी शासकीय मंजुरी मिळवून दिली. तसेच मुंबई येथील रुग्णालयात दाखल शस्त्रक्रिया पार पाडल्या आहेत, त्यामुळे सांगली जिह्याला राज्यात पहिले स्थान मिळाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.