Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजपूर्व भागात दोन खून

मिरजपूर्व भागात दोन खून 

 

सांगली दिं.२४ सांगली जिल्ह्यातील  मिरज तालुक्यातील पुर्व भागात आज दिवसभरात दोन खुनाचे प्रकार घडले.बेडग येथे जमिन वाटण्याच्या कारणावरून मुलाने जन्मदात्या बापावर ट्रक्टर घालून बापाला ठार केले तर एरंडोली येथे पत्नीने नवऱ्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. मिरज तालुक्यात एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. बेडग येथील  उपारवस्ती येथे राहणारे दादासो गणपती आकळे यांच्या अंगावर मुलगा लक्ष्मण आकळे याने ट्रॅक्टर चालवून त्यांचा चिरडून खून केला. तर एरंडोली येथील आरग-स्टेशनरस्त्यावरच्या पारधीवस्तीवर राहणारे सुभेदार आनंदा काळे (वय ४०) यांचा पत्नी रंजीता हिने  धारदार हत्याराने छातीत पोटात वार करून नवऱ्याचा खून केला. या दोन्ही घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे.

बेडग येथे मालगाव रोडवरील उपार वस्ती येथे दादासो गणपती आकळे यांचे राहते घर व शेती आहे. त्यांचे तीन विवाह झाले होते. पहिली पत्नी हिला दोन मुले आहेत. पहिल्या पत्नीने विहिरीत पडून आत्महत्या केली होती. तर दुसर्‍या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तिसरी पत्नी हिला एक आपत्य असल्याचे समजते.  
पहिल्या पत्नीचा मुलगा  लक्ष्मण आकळे व वडील दादासो आकळे यांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरून तसेच शेतजमिनीवरून कायम वाद होत होता. लक्ष्मण आकळे याने वडील दादासो आकळे यांच्याकडून ८० हजार रूपये घेतले होते. दिलेले पैसे दादासो आकळे हे मुलाकडे मागत होते. त्यावरून खटके उडत होते. 

आज सकाळी दोघांमध्ये याच कारणावरून वाद सुरू होता.  दादासो आकळे यांनी या भांडणाची माहिती त्यांनी आपल्या दुसर्‍या मुलाला सांगितली होती. त्या मुलाने घरी आल्यानंतर पाहूया असे सांगितले. परंतु लक्ष्मण आकळे याला वडिलांचा राग आला होता. सकाळी दादासाो आकळे हे बाहेर गेल्यानंतर मुलगा लक्ष्मण आकळे हा चिडून जावून त्याने वडील दादासो आकळे यांना ट्रॅक्टर खाली चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मिरज ग्रामीण पोलिसांना समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मुलगा लक्ष्मण आकळे याला अटक केली आहे.  ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.  मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

दरम्यान एरंडोली येथील आरग-स्टेशनरस्त्यावरील फॉरेस्टच्या जागेवर असलेल्या पारधीवस्तीवर पती-पत्नीच्या  भांडणातून पत्नी रंजीता आनंदा काळे (वय ३५) हिने पती सुभेदार आनंदा काळे(वय ४०) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. पत्नी रंजीता ही तेथून फरार झााली आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे.


आरग-स्टेशनरोडवर फॉरेस्टच्या जागेवर तीन ते चाळीस पारधीलोक राहतात. त्याचवस्तीवर सुभेदार आनंदा काळे व पत्नी रंजीता हे दोघेजण राहतात. सुभेदार याला दारूचे व्यसन होते. दारूच्या व्यसनामुळे  सुभेदार व पत्नी रंजीता याच्यामध्ये कायम भांडणे होत होती. शिवीगाळ आणि हाणामारी हा प्रकार कायम घडत होता. सुभेदार हा दारू पिवून आला व पत्नी रंजीता हिला लवकर स्वयंपाक करत नाही म्हणून शिवीगाळ तसेच मारहाण करू लागला. सतची मारहाण  आणि शिवीगाळ यातून रंजीता चिडून जावून शिकारीसाठी वापरण्यात येणारे धारदार हत्याराने सुभेदार याच्या छातीत व पोटात वार करून खून केला. सुभेदार याचा जागीच मृत्यू झाला. सुभेदार याची पत्नी रंजिता तेथून फरार झाली आहे. या घटनेची ही नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे. 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.