Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चंडीगड येथील सरकारी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ विद्यार्थ्यांनी अनेक वेळा केला बलात्कार!

चंडीगड येथील सरकारी शाळेत १३ वर्षीय विद्यार्थिनीवर ५ विद्यार्थ्यांनी अनेक वेळा केला बलात्कार!


चंडीगड (हरियाणा): येथील 'मॉर्डन स्कूल' नावाच्या एका सरकारी शाळेतील सातव्या इयत्तेत शिकणार्‍या विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी अनेक वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेमध्ये, तसेच शाळेच्या बाहेर हे घृणास्पद कृत्य करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा घटनाक्रम १८ मे या दिवशी समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

१३ वर्षीय पीडितेवर आधी तिच्याच वर्गात शिकणार्‍या विद्यार्थ्याने बलात्कार केला. या वेळी विद्यार्थ्याने पीडितेवर चोरीचा आरोप करून तिला गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर इयत्ता ९ वीत शिकणार्‍या ४ विद्यार्थ्यांनीही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. या घटनांविषयी आधी शाळेतीलच एका शिक्षिकेला माहिती मिळाली. त्यांनी प्राचार्यांना याविषयी सांगितल्यानंतर पोलिसांना, तसेच पीडितेच्या कुटुंबियांना सूचित करण्यात आले. पाचही आरोपींना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून पीडितेचे समुपदेशन करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

ही घटना युवा पिढीचे किती प्रमाणात नैतिक अध:पतन झाले आहे, हेच दर्शवते ! मुलांना केवळ भौतिक शिक्षण दिल्याचाच हा परिपाक होय. खरेतर त्यांना धर्म आणि साधना शिकवून ती करवून घेतली, तरच अशा घटना थांबणार आहेत, हे आपण कधी लक्षात घेणार ?

अल्पवयीन आरोपींवर कायद्याचा बडगा उगारता येत नाही; पण अशा घटनांतून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे, हेच लक्षात येते ! अध्यात्मविहीन कायदे बनवणार्‍या भारतीय व्यवस्थेकडे यावर काय उत्तर आहे ?


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.