ठाणेदारांना एसपींचा दणका
सांगली : बरीच वषेर् एकाच उपविभागात तसेच ठराविक पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या ठाणेदारांना एसपी डॅ. बसवराज तेली यांनी चांगलाच दणका दिला आहे. सांगली जिल्ह्यातील एक हजारहून अधिक पोलिस अंमलदारांच्या वाषिर्क बदल्या यंदा लवकर करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील पोलिस अंमलदारांच्या बदल्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्याही दबाव, शिफारसीला न जुमानता या बदल्या केल्यामुळे बहुतांशी अंमलदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
कायर्काल पूणर् झालेल्या जिल्ह्यातील ११४ सहायक उपनिरीक्षकांच्या जिल्हांतगर्त बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील २० जणांना एक महिना ते एक वषर् मुदतवाढ देण्यात आली आहे. तर २८९ हवालदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यातील १४ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. १२९ पोलिस नाईक यांच्या बदल्या झाल्या आहेत तर त्यातील ८ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शिपाई पदावरील ५१३ जणांची बदली झाली असून त्यातील ८१ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६५ चालकांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यातील ८ जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे.विनंतीनुसार ४ सहाय्यक उपनिरीक्षक, १२ हवालदार, पोलिस नाईक १३, शिपाई २८, चालक १४ यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे गेली दोन वषेर् जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांचे गॅझेट रखडले होते. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी यंदा बॅकलॅग भरून काढत मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. बदल्यांसाठी कोणाचीही शिफारस, दबाव आणयचा नाही असे सक्त आदेशच डॅ. तेली यांनी बदल्यांपूवीर्च सवर् पोलिस ठाणी, विविध विभागांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. बहुतांशी अंमलदारांना मनाप्रमाणे बदली मिळाल्याने पोलिस अंमलदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.