नोटबंदी पावली ! राजस्थान मध्ये सापडले मोठे घबाड बंडलच बंडल
2000 रुपयांच्या नोटबंदीचा बातमी येऊन धडकल्यानंतर लागलीच जयपूरमध्ये गोंधळ उडाला. जयपूरच्या योजना भवनातील आयटी विभागात 2 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या या नोटांमध्ये 2 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. राजस्थानचे मुख्य सचिव, पोलीस निदेशक आणि पोलिस आयुक्त यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आली माहिती
नोटांचा इतका मोठा साठा सरकारी इमारतीत सापडल्याने अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. पोलीस आयुक्त आनंद श्रीवास्तव यांनी याप्रकरणी तपास सुरु असल्याचे सांगितले. पूर्ण चौकशी झाल्यावरच याविषयीची पुढील अपडेट कळविण्यात येणार आहे. या सर्व घटनाक्रमाची माहिती मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना देण्यात आली आहे. तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
असा लागला तपास
संध्याकाळी उशीरा, पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त जयपूरचे आनंद श्रीवास्तव यांनी या संपूर्ण प्रकरणावरुन पडदा हटविला. येथील योजना भवनातील IT विभागातील तळघरात दोन कपाट आहेत. त्यांना उघडण्यात आले. त्यामध्ये एक लॅपटॉप बॅग आणि भलीमोठी ट्रॉली सुटकेस सापडली. त्यामध्येच हे घबाड सापडले. लागलीच याची पोलिसांना माहिती देण्यात आली
2 कोटी रोख, 1 किलो सोने
पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. नोटांची मोजणी झाली. यामध्ये 2 कोटी 31 लाख 49 हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. 1 किलो गोल्ड बिस्किट पण सापडले. या नोटांमध्ये मोठ्या प्रमाणावर 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा सापडल्या.
विशेष पथक करणार तपास
राज्य सरकारने तातडीने याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष समिती गठित केली. ही समिती आता पुढील तपास करेल. हे कपाट अनेक महिन्यांपासून बंद असल्याची माहिती समोर येत आहे. शुक्रवारी संध्याकाळी हे कपाट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
आकडेवारी काय सांगते
RBI च्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या 2000 एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या एकूण नोटांच्या हे प्रमाण 1.6% आहे. मूल्यानुसार एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात इतक्या प्रमाणात नोटा असूनही त्या चलनात, व्यवहारात न दिसल्याने नागरिकांना पूर्वीच बंद होण्याची आशंका
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.