Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चोर, बेवकूफ किंवा मूर्ख म्हणणे ऍट्रॉसिटीच्या कक्षेत येत नाही

चोर, बेवकूफ किंवा मूर्ख म्हणणे ऍट्रॉसिटीच्या कक्षेत येत नाही


एखाद्या व्यक्तीला चोर, बेवकूफ अथवा मूर्ख म्हटल्याने अनुसूचित जाती-जमाती कायद्याच्या कक्षेत येत नाही. जातिवाचक शिवीगाळ किंवा टिप्पणी असेल तरच या कायद्याअंतर्गत येऊ शकेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मारहाण व अनुसूचित जाती-जमाती कायद्याअंतर्गत दाखल झालेला खटला रद्द करताना न्यायमूर्ती एस. रवींद्र भट व दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

उत्तर प्रदेशात जानेवारी 2016 मध्ये दोन कुटुंबात झालेल्या वादानंतर पोलिसांनी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडे केवळ तीनच साक्षीदार होते. आरोप सिद्ध करण्यासाठी एखादा सार्वजनिक साक्षीदार गरजेचा होता. पोलिसांनी तक्रारदाराच्या प्रभावाखाली कारवाई केल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. अनुसूचित जाती-जमातीमधील व्यक्तीला मारहाण केल्याने अथवा मूर्ख, चोर म्हटल्याने ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत दुसऱया पक्षाविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही हे पोलिसांनी समजून घेतले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.