प्रतिकूल परिस्थितीत लठ्ठे साहेबांनी कामाचा डोंगर उभा केला : डॉ. अजित पाटील
सांगली (दि.16) : दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी स्तवनिधी 124 वर्षापूर्वी दक्षिण भारत जैन सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. ज्या काळात निधी, प्रवास, दळणवळण सुविधा नव्हत्या, शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणे प्रचंड प्रमाणात होते. अशा काळात त्यांनी केलेले काम अवाढव्य आहे. करवीर संस्थानात त्यानी शिक्षणाधिकारी, दिवाण म्हणून केलेल्या कामामुळे बहुजनांचे हित झाले. त्यांच्या गौरव निधीतून लठ्ठे एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. ते उत्तम लेखक, वक्ता होते. त्यांनी केलेले काम पुढे नेटाने नेणे हेच त्यांना अभिवादन होय असे भावपूर्ण उद्गार सभेचे मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील यांनी काढले.
आज दक्षिण भारत जैन सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात सभेचे अध्वर्यू दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांची 73 वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या शासक समितीचे सदस्य अभय सुरेश पाटील यांच्या हस्ते स्व. लठ्ठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील यावेळी ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे, महामंत्री प्रा. एन. डी. बिरनाळे व सभेचा सेवक वर्ग उपस्थित होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.