Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शेत तळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू

शेत तळ्यात बुडून तरूणाचा मृत्यू 


सांगली :  जत तालुक्यातील बिळूर येथे शेत तळ्यातील पाणी काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. 

रामगोंडा परगोडा हिप्परगी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.  रामगोंडा गुरुवारी सकाळी जनावरांना पाणी पाजण्यासाठी शेताजवळ असलेल्या लक्ष्मीबाई नरूटे यांच्या शेत तळ्यातून पाणी आणण्यासाठी गेला होता. दरम्यान तळ्यातील पाण्याची पातळी खाली गेली होती. रामगोंडा शेत तलावातील पाणी काढत असताना तोल गेल्याने पाय घसरून तळ्यात पडला. 

यावेळी तळ्याजवळ असलेल्या एका मुलाने ही घटना रामगोंडा यांच्या घरी सांगितली. रामगोंडा यास पोहता येत नव्हते. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.