Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पैसे मी देतो पण पंचायत समितीत व्हीसी रूम करा: आमदार अनिल बाबर

पैसे मी देतो पण पंचायत समितीत व्हीसी रूम करा: आमदार अनिल बाबर 


विटा : तुम्हाला जमत नसेल, तर पैसे मी देतो, पण लवकरात लवकर पंचायत समितीत स्वतंत्र ‘व्हिडीओ कॉन्फरन्स रूम’  तयार करा, अशा शब्दांत आमदार अनिल बाबर यांनी पंचायत समितीच्या अधिका ऱ्यांना सुनावले. विट्याच्या पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्यावरच्या मोठ्या सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीची तयारी सुरू होती. तिथे तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल लोखंडे, डॉ. विशाल नलवडे, प्रांताधिकारी संतोष भोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, कक्ष अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर आदी अधिकारी कार्यक्रमाची तयारी करीत होते. बरोबर दहा वाजता आमदार बाबर, विटा बँकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, उपाध्यक्ष उत्तमराव चोथे, डॉ. अवधूत बापट आले.

त्यानंतर विटा पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपमुख्याधिकारी स्वप्निल खामकर आदी अधिकारी हजर झाले. आज (दि. १) महाराष्ट्र दिनापासून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार होता. त्यासाठी आमदार बाबर सहभागी होणार होते. परंतु, पंचायत समितीच्या सभागृहात उभारलेल्या पडद्यावर विट्यातील दृश्य सोडून सगळीकडचे दृश्य वेगवेगळ्या चौकटीत दिसत होते.

सुरुवातीला कॅमेराचा प्रॉब्लेम असल्याचे सांगितले गेले. मात्र, प्रत्यक्ष कार्यक्रमाची वेळ जशी जवळ आली, तसे पडद्यावरचे चित्रच गायब झाले. ज्या लॅपटॉपशी पडदा जोडला होता. त्यातच नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू झाला. हळूहळू संयम सुटल्याने आमदार बाबर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना “तुमच्याकडे स्वतंत्र व्हीसी रूमची व्यवस्था का नाही ? किती वेळा सांगायचे ?, कोरोना काळानंतर मी प्रत्येक वेळेस सांगतोय, पण तुम्ही गांभीर्याने घेत नाही. अलीकडच्या काळात प्रत्येक शासकीय कार्यालयात व्हीसी रूम गरजेची झाली आहे.

तुमच्याकडून होत नसेल, तर मी पैसे देतो. पण लवकरात लवकर पंचायत समितीची स्वतंत्र व्हीसी रूम तयार करा, असे आमदारांनी सांगितले. दरम्यान, इतके होईपर्यंत हा कार्यक्रम पडद्यावर दिसण्यासाठीची कर्मचा ऱ्यांची खटपट सुरूच होती. तेवढ्यात कोणीतरी मोबाईल सुरू करून’ ऑनलाईन’ कार्यक्रम दाखविण्याचा प्रयत्न केला. अखेरीस पुन्हा कलेक्शन रिस्टोअर झाले. आणि उपमुख्यमंत्र्यांचे निम्मे आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण पडद्यावर पाहायला मिळाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.