Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूरच्या अधीक्षकपदी महेंद्र पंडित यांची नियुक्ती

कोल्हापूरच्या अधीक्षकपदी महेंद्र पंडित यांची नियुक्ती


मुंबई :  राज्यातील सहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर राज्य पोलिस सेवेतील दोघांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी मुंबईतील उपआयुक्त महेंद्र पंडित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूरचे अधीक्षक शैलेश बलकवडे यांची पुण्यातील राज्य राखीव बल १ कडे समादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे.  

मुंबईतील उपायुक्त योगेशकुमार गुप्ता यांची नांदेड येथील नागरी हक्क संरक्षणचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अकोल्याच्या अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांची नाशिक शहरच्या पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. जालना पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचायर् अभय डोंगरे यांची अकोल्याचे अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. 

जालनाचे पोलिस अधीक्षक आयपीएस अधिकारी अक्षय शिंदे यांची नागपूर लोहमागर्चे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडच्या नागरी हक्क संरक्षणचे अधीक्षक जयंत मीना यांची पुण्यातील दहशतवाद विरोधी पथकाकडे बदली करण्यात आली आहे. तर पुण्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे अधीक्षक तुषार दोषी यांची जालनाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.