शरद पवार यांच्या निवृत्तीला कार्यकर्त्यांचा विरोध
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राजकीय जीवनातून मंगळवारी निवृत्तीची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर यशवंतराव चव्हाण सेंटरमधील सभागृहात कार्यकर्त्यांनी विरोध केला. यावेळी त्यांनी शरद पवार, शरद पवार अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडलं. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले होते.
लोक माझे सांगाती' या शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचं आज प्रकाशन झालं. यावेळी पवारांनी आपले राजकीय जीवनातील आता तीन वर्षे शिल्लक असून यानंतर आण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखपदावरुन निवृत्त होणार असून राजकारणातूनही निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. शरद पवारांनी ही घोषणा करताच सभागृहात उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवत शरद पवारांच्या नावानं घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यामुळं काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसर्या भागाचं प्रकाशन नुकतचं यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलं. यावेळी शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पवारांनी आपल्या या आत्मचरित्रातून महाविकास आघाडीसह नंतरच्या राजकीय घडामोडींवरही यात भाष्य करण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.