राज्यातील तब्बल १३९ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याअजित टिके कोल्हापूर शहर, अण्णासाहेब जाधव सांगली शहर
मुंबई : राज्यातील तब्बल १३९ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या स्वाक्षरीने बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. सांगली शहरचे उपअधीक्षक अजित टिके यांची कोल्हापूर शहरकडे नियुक्ती करण्यात आली आहे. तर अहमदनगरमधील कजर्त येथील अण्णासाहेब जाधव यांची सांगली शहरचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
इस्लामपूरचे तत्कालीन उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची वधार् येथे नियुक्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरचे उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाडचे उपअधीक्षक समीरसिंग साळवे यांची इचलकरंजीचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तासगावच्या उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांची सातारा जिल्ह्यातील दहिवडीच्या उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
गडचिरोली येथील उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांची मिरज शहरचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर शहरचे सहायक पोलिस आयुक्त सचिन थोरबोले यांची तासगावचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. वधार् जिल्ह्यातील आवीर् येथील उपअधीक्षक स्वप्नील साळुंखे यांची जतचे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील उपअधीक्षक डॅनियल बेन यांची सांगली मुख्यालयाचे उपअधीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या सीआयडीकडील उदय डुबल यांची तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्र येथे उपअधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.