सिद्धरामय्या आणि डी के शिवकुमार यांच्या शपधविधीला;शरद पवार व उद्धव ठाकरेंना निमंत्रण
आज अखेर काँग्रेसकडूनकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. सिद्धरामैय्या पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री असतील. उपमुख्यमंत्रिपदासह डीके शिवकुमार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटककाँग्रेसचे अध्यक्ष राहतील. चार दिवसांच्या विचारमंथनानंतर मुख्यमंत्री चेहरा ठरला आणि शपथविधीची तारीखही जाहीर झाली.
20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बंगळुरू येथे शपथविधी होणार आहे. यासाठी पक्षानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांसह देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रित केले जाणार आहे. मात्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्यासह अनेकांना निमंत्रण यादीत ठेवलेले नाही.
या नेत्यांना आमंत्रण
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारबिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवतामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनझारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनपीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्तीसीपीआयचे सरचिटणीस डी राजासीताराम येचुरी, सरचिटणीस, सीपीआय (मार्क्सवादी)बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेअभिनेता आणि MNM प्रमुख कमल हासन
या नेत्यांना आमंत्रण नाही
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर
10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जबरदस्त विजय मिळवला आहे. पक्षाने 224 पैकी 135 जागा जिंकल्या आहेत. भाजप 66 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत काँग्रेसमध्ये जोरदार वाद सुरू होता. पण, आज अखेर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.