Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आदर पुणावाला यांच्या पत्नीचा मेट गाला मधील लूक पाहून लोक हैराण

आदर पुणावाला यांच्या पत्नीचा मेट गाला मधील लूक  पाहून लोक हैराण 


आदर पुनावाला यांची पत्नी नताशा पुनावाला ही कायमच तिच्या फॅशनमुळे चर्चेत राहते. इतकेच नाही तर बऱ्याच वेळा तिच्यावर टिका देखील केली जाते. मेट गाला 2023 मध्ये आलिया भट्ट हिचा जलवा हा बघायला मिळाला आहे. यामध्ये डेब्यू हा आलिया भट्ट हिने केला आहे. आलिया भट्ट हिच्यामुळे सर्वांच्या नजरा या मेट गाला 2023 कडे होता. मात्र, आलिया भट्ट हिच्यापेक्षाही सध्या नताशा पुनावाला हिच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

मेट गाला 2023 मध्ये नताशा पुनावाला ही देखील सहभागी झाली होती. नताशा पुनावाला हिची फॅशन पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. अतरंगी ड्रेसमध्ये नताशा पुनावाला ही दिसली आहे. मेट गालामध्ये नताशा सिल्वर रंगाच्या गाऊनमध्ये दिसली आहे. नताशा हिचा हा ड्रेस पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. नताशा हिने घातलेला हा ड्रेस अत्यंत चमकदार होता.

नताशा हिच्या या लूकची जोरदार चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. एकाने कमेंट करत लिहिले की, मॅडम तुम्ही हे नेमके काय घातले आहे? दुसऱ्याने लिहिले की, ही नेमकी कोणती इमारत आह? तिसऱ्याने लिहिले की, तुम्ही नक्कीच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करायला हवे, तुमच्यासाठी तिच एक योग्य जागा आहे. अजून एकाने लिहिले की, मला तुमचा हा खास ड्रेस खूप आवडला आहे.

आदर पुनावाला आणि नताशा यांचे लग्न 2006 मध्ये झाले असून यांना दोन मुले देखील आहेत. नताशा पुनावाला ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते. मेट गालामध्ये गेल्या वर्षी देखील नताशा पुनावाला हटके स्टाईलमध्ये पोहचली होती. यावेळच्या लूकही देखील जोरदार चर्चा होताना दिसत आहे. काही लोक नताशाच्या फॅशनचे काैतुक करत आहेत तर काही लोक हे नताशा हिला टार्गेट करताना दिसत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.