वरदविनायक सामाजिक संस्थेमार्फत महाआरोग्य शिबीर संपन्न
भाळवणी पंचक्रोशी मधील शेळकबाव, पंचलिंगनगर , कमळापूर, कळंबी, ढवळेश्वर , शिरगाव तसेच आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिकांच्यासाठी श्री अमोल आनंदराव शिंदे यांच्या वरदविनायक सामाजिक संस्थेमार्फत गावातील गरजुंना तसेच सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले .
या महाआरोग्य शिबिरामध्ये खाजगी क्षेत्रातील तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स यांच्याकडून कान, नाक व घसा यावरील स्पेसिऍलिस्ट डॉक्टर विल्सन देसाई यांनी तपासणी केली तसेच दातांची तपासणी डॉक्टर वैभव माने, डोळ्यांची तपासणी डॉक्टर दीप्ती पाटील यांनी करून डॉक्टरांच्या सल्यानुसार सर्व पेशंटना वरदविनायक सामाजिक संस्थेमार्फत औषधे व गोळ्या पूर्णपणे मोफत दिल्या. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे विटा PSU चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक लवटे लाभले, त्यांनी सुद्धा पेशंट व नागरिकांना मार्गदर्शन केले, व सर्व शिबिराची पाहणी केली.
याप्रसंगी श्री. अमोल शिंदे म्हणाले कि आपल्या भागातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे तसेच गावा गावामध्ये सुद्धा प्रत्येक आजाराचे स्पेसिऍलिस्ट डॉक्टर शिबिराच्या माध्यमातून पोचवून जास्तीत जास्त सर्व पेशंटच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्याचे प्रयत्न आम्ही आमच्या संस्थेमार्फत करणार आहोत.
आम्ही नेहमी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करत राहू, आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे आपण कमी लक्ष्य देतोय. जो तो आपल्या कामात व्यस्त असतो परंतु आरोग्याकडे लक्ष्य न दिल्याने आरोग्य जास्त बिघडले जाते , त्यासाठी आम्ही आरोग्य विषयक शिबीर राबवत आहोत. गावा गावामध्ये स्पेसिऍलिस्ट डॉक्टर्स यांची सेवा शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत पोचवणार व समाजाची सेवा करत राहणार. त्यासाठी तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा नेहमी माझ्या सोबत राहाव्यात असे संस्थापक अध्यक्ष श्री. अमोल आनंदराव शिंदे यांनी सांगितले. आरोग्य शिबिराच्या सेवेला शुभेच्या देण्यासाठी गावातील मान्यवर उपस्तिथ होते.ग्रामपंचायत सरपंच व कमिटी मार्फत सर्व डॉक्टर्स टीम चा व संस्थेचे संस्थापक अमोल शिंदे यांचा सन्मान केला.सरपंच श्री. आनंदा आदाटे , उपसरपंच अन्सार मुल्ला ग्रामपंचायत सदस्य व माजी तालुका पंचायत समिती सदस्य संजय मोहिते , राजेंद्र शिंदे ,सागर सूर्यवंशी, संदीप पाटील, सतीश पवार, धनाजी शिंदे , तंटामुक्ती अध्यक्ष संपत शिंदे , बापूराव साळुंखे, संजय शिंदे सर, अमोल सूर्यवंशी, तुषार शिंदे , तसेच समाजसेवक आनंदा खेराडे, पांडुरंग कांबळे, रोहित शिंदे , शुभम शिंदे, विकी कांबळे ,राहुल चव्हाण, सतीश कांबळे, डॉक्टर राहुल माळी ,किरण जाधव, डॉक्टर वैभव कोळी , दीपक सूर्यवंशी, रुपाली पवार, दीपाली शिंदे , कोमल शिंदे , तसेच माउली प्रतिष्टान बलवडी चे प्रशांत पवार सर उपस्थित होते. जवळपास ३०० नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.