जयंत पाटील हाजीर हो ; ईडीची दुसऱ्यांदा नोटीस
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली आहे. त्यांना २२ मे ला ईडी'च्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपुर्वीही जयंत पाटील यांना ईडी'ने नोटीस पाठवत त्यांना आज सोमवारी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण त्यांनी ईडी'कडे वेळ मागितली होती. त्यानंतर त्यांना IL&FS प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ईडीने दुसऱ्यांदा नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.