Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तहसीलदाराने मागितली दोन लाखांची लाच; शेतकऱ्यांनी पोटची ९ मुलं गहाण ठेवली

तहसीलदाराने मागितली दोन लाखांची लाच; शेतकऱ्यांनी पोटची ९ मुलं गहाण ठेवली


सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचेचा लोभ वरचेवर वाढतच चालाल आहे. देशाला पोखरुन खाल्लेल्या लाचखोरीचा एक संतापजनक प्रकार घडला आहे. एका तहसीलदाराने शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र शेतकऱ्यांकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते. शेवटी त्यांनी पोटच्या ९ मुलांना गहाण ठेवलं. ही घटना राजस्थनाच्या जोधपूर येथे घडली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जिल्ह्यात ही घटना घडल्याने संताप व्यक्त होतोय. राजस्थानमधल्या या घटनेने देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

जोधपूरमधील फलौदी येथील काही शेतकऱ्यांनी जमिनी वाटणीच्या कामासाठी अर्ज केला होता. मात्र तहसीलदारांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. शेतकऱ्यांसाठी तहसीलदारांना देण्यासाठी दोन लाख रुपये नव्हते, त्यामुळे त्यांनी आपल्या पोटच्या नऊ मुलांना तहसीलदारांकडे ठेवलं आणि तिथून निघून गेले. त्या मुलांनी कालची रात्र तहसीलदारांकडेच काढली.

फलौदी तालुक्यातल्या ढढू गावातले १३ शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामुळेच त्यांनी ९ मुलांना रात्रभर तहसील कार्यालयात गहाण ठेवलं. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी एसडीएम आणि महसूलचे वरिष्ठ अधिकारी पोहोचले. याप्रकरणी कुठल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याची माहिती नाही. हे प्रकरण १९९८ पासूनचं असल्याची माहिती मिळत आहे. तहसीलदाराने या कामासाठी प्रत्येकी २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.