Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चक्क सायबर चोरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच टार्गेट केल्यामुळे खळबळ उडाली आहे

चक्क सायबर चोरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच टार्गेट केल्यामुळे खळबळ उडाली आहे



पुणे: राज्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावरून फसवणुकीच्या अनेक घटना दररोजच आपल्या कानावर येत असतात. बनावट फेसबुक अकाऊंट उघडून सर्वसामान्यांना पैशांनी लुटण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत.

मात्र, आता सायबर चोरांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच टार्गेट केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्याचे  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या नावानेच बनावट फेसबुक अकाऊंट उघडल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी डॉ. राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांमध्ये याबाबतची तक्रार दिली आहे.

सायबर   क्राइम   चोरट्यांनी 'माही वर्मा' या नावाने हे बनावट अकाऊंट तयार केलं होतं. या अकाऊंटवरून जिल्हाधिकारी देशमुख यांचे फोटो देखील पोस्ट करण्यात आले होते. तसेच देशमुख यांच्या मूळ अकाऊंटवरील काहींना रिक्वेस्टही पाठवण्यात आल्या होत्या. सायबर चोरट्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दरम्यान, डॉ.राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधीही दोन वेळा अज्ञातांनी फेसबुक अकाऊंट तयार केलं होतं. त्यामुळे अशा कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन डॉ.राजेश देशमुख यांनी नागरिकांनी केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.