Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मित्राच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीतच बसून राहिला; शेवटी स्वतःही जळत्या चितेवर घेतली उडी

मित्राच्या मृत्यूनंतर स्मशानभूमीतच बसून राहिला; शेवटी स्वतःही जळत्या चितेवर घेतली उडी


लखनऊ 28 मे : असं म्हणतात, की मैत्री हे अतिशय सुंदर नातं असतं. रक्ताचं नसलं तरी ते इतकं घट्ट बांधलं गेलेलं असतं की आयुष्यभर सोबत राहात. मैत्रीचं असंच उदाहरण यूपीच्या फिरोजाबादमध्ये पाहायला मिळालं. जिथे मित्राच्या मृत्यूनंतर एका व्यक्तीने त्याच्या जळत्या चितेवर उडी घेतली, ज्यात त्याचाही मृत्यू झाला. प्राथमिक शाळेपासून ते एकत्र शिकले आणि एकत्र पुढे गेले. पण शनिवारी एका मित्राचा कॅन्सरने मृत्यू झाला तेव्हा दुसऱ्याला हे दु:ख सहन झालं नाही. आधी तो स्मशानभूमीमध्ये खूप रडला, नंतर जळत्या चितेवर उडी मारली.

यानंतर त्याचाही रुग्णालयात मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना पोलीस स्टेशन नागला खंगार परिसरातील स्वरूप घाटातील आहे. आनंद गौरवचा मित्र अशोक (35 वर्ष) याचा शनिवारी कर्करोगाने मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 30 वर्षांची मैत्री संपुष्टात आली तेव्हा आनंदला हा धक्का सहन झाला नाही. अशोकाची चिता जळत असताना आनंदने त्यात उडी घेतली. लोकांना काही समजेपर्यंत आनंद 95 टक्के भाजला होता. घाईगडबडीत त्याला उपचारासाठी आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं, तिथे त्याचा मृत्यू झाला. आनंद हा फिरोजाबादच्या गढिया पंचम गावचा रहिवासी आहे.

आनंद आणि अशोक यांनी प्राथमिक शाळेतून एकत्र शिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे. अशोक सहा महिन्यांपासून आजारी होता. महिनाभरापूर्वी डॉक्टरांनी त्याला कॅन्सर सांगितला. अशोक यांनी शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. यानंतर यमुनेच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिता पेटवून सर्वजण घरी परतायला लागले, पण गौरव तिथेच बसून रडत राहिला. त्यानंतर अचानक त्याने जळत्या चितेत उडी घेतली. चितेला लागलेल्या भीषण आगीमुळे गौरव 95 टक्के भाजला.

त्याला गंभीर जखमी स्थितीमध्ये रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एसपी देहात रणविजय सिंह यांनी सांगितलं की, गौरवला त्याच्या मित्राचा मृत्यू सहन झाला नाही आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली. अशोक यांचं दीर्घ आजारानं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आणि घरी परतायला सुरुवात केली.

तेव्हाच गौरवने जळत्या चितेत उडी घेतली. गंभीररित्या जळालेल्या गौरवला प्रथम फिरोजाबाद आणि नंतर आग्रा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं, तिथे त्याचा मृत्यू झाला. दोघांमध्ये घट्ट मैत्री होती आणि गौरवला मित्राचा मृत्यू सहन झाला नाही. मात्र, पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.