दक्षिण भारत जैन सभेला आमदार विश्वजीत कदम यांची सदिच्छा भेट
सांगली : महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री, आमदार श्री. विश्वजीत कदम यांची दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली येथील मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. श्री. बी.बी.पाटील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) होते. प्रास्ताविकामध्ये चेअरमन श्री. रावसाहेब जि. पाटील यांनी सभेच्या कार्याचा आढावा घेवून अल्पसंख्यांक जैन समाजाच्या समाजोपयोगी कार्यामध्ये स्व. पतंगराव कदम यांचे त्याचबरोबर आमदार श्री. विश्वजीत कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. अल्पसंख्यांक जैन समाज हा देशपातळीवर सधन आणि सर्वाधिक इन्कम्टॅक्स जमा करणारा समाज म्हणून दिसत असला तरी या महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील समाज हा शेतीवर आधारलेला असून त्याच्याही काही समस्या आहेत ज्या सामुदायिक स्वरूपात सोडविण्याची आवश्यकता आहे. आपली जैन समाजाशी आणि समाजाची आपल्यावर असलेल्या प्रेम आणि आपुलकीतून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली.
आमदार श्री. विश्वजीत कदम म्हणाले सत्ता असो वा नसो जैन समाजाशी स्व. पतंगराव कदमसाहेबांचे असलेले ऋणानुबंध यापुढे अजून दृढ होत राहतील. समाजाच्या एकूण प्रश्नासाठी सरकारी असो, वैयक्तिक ट्रस्टच्यामाध्यमातून असो, अल्पसंख्यांक कोट्यामधून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. हा समाज आहे. कामावर आणि समाज कार्यावर निष्ठा असणारा निस्वार्थी समाजाचे काम करण्यात एक वेगळे समाधान लाभते. रावसाहेब पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली सभेने सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खरोखर अत्यंत उत्कृष्ट कार्य करीत आहे. निस्वार्थपणे सभेचे पदाधिकारी कार्यकर्ते भ. महावीरांचा संदेश तळगाळात पोहोचविण्याच काम करीत आहात त्याला माझ्या शुभेच्छा आहेत. तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक प्रश्नामध्ये तुमच्यासोबत मी असेन, सभेच्या कोणत्याही कार्यात मी कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी सभेचे अध्यक्ष श्री. रावसाहेब आ. पाटील (दादा) यांच्याकडे रु. 6 लाखाचा धनादेश सुपूर्द केला. सभेच्यावतीने अध्यक्षांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. यावेळी केेंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांचेही मनोगत झाले.
मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी स्वागत केले. तर आभार खजिनदार श्री. संजय शेटे यांनी मानले. यावेळी सहखजिनदार अरविंद मजलेकर, ट्रस्टी शांतिनाथ नंदगावे, उपाध्यक्ष शशिकांत राजोबा, महामंत्री प्रा.एन.डी.बिरनाळे, प्रशांत पाटील (मजलेकर), महीला महामंत्री कमल मिणचे, श्रीमती अनिता पाटील, अंजली कोले, सागर वडगावे, आण्णासाहेब पाटील, भूपाल देसाई, डॉ.सी.एन.चौगुले, प्रा.ए.ए.मुडलगी, प्रा.राहुल चौगुले, सुनिल पाटील, अभय पाटील, महावीर आडमुठे, रमेश आरवाडे यांचेसह सभेच्या सर्व शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.