Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिला; आता राज्यात थरार रंगणार

कोर्टाने बैलगाडा शर्यतीला हिरवा कंदील दिला; आता राज्यात थरार रंगणार 


नवी दिल्ली : राज्यात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. गेल्या काही वर्षापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये बैलगाडा शर्यतीसंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे. या निर्णयामुळे बैलगाडा हौशींमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालं आहे. 

सर्वोच्च न्यायालयात आज बैलगाडा आणि जल्लू कट्टू हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यांशी संबंधित याचिकांवर निकाल देण्यात आला. या निकाल कोर्टात डिसेंबर पर्यंत राखून ठेवला होता. परंतु त्यावर आज कोर्टात निकाल देण्यात आला आहे. या संंबंधित तीन्ही राज्यांनी कायदा केला होता. त्यावर कोर्टाने हिरवा कंदिल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने २०१४ साली बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. त्यानंतर २०१६ साली सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली. परंतु काही संघटनांनी यावर याचिका दाखल केल्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. त्यांनी काही अटी शर्ती कोर्टाने घालून दिल्या होत्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.