Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास विश्रामबाग पोलिसांनी केली अटक

घरफोड्या करणाऱ्या  सराईत गुन्हेगारास विश्रामबाग पोलिसांनी केली अटक


सांगली, ता. २३ ः शहरात घरफोड्या करणाऱ्या सोलापूर येथील सराईत गुन्हेगारास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. बाबु काजाप्पा मुंगली (वय २७, रा. शांतीनगर, मजेरवाडी, सोलापूर ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सहा घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. यामध्ये विश्रामबागमधील पाच आणि संजयनगर परिसरातील एका घरफोडीचा समावेश आहे. पोलिसांनी २ लाख ४२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. अधिक माहिती अशी, की मागील काही दिवसांपासून शहर परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरट्याच्या शोधासाठी पोलिसांनी गस्त वाढवली होती. 

तसेच विश्रामबाग परिसरात कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकाऱ्यांना त्रिमुर्ती कॉलनी परिसरात एकजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता प्रारंभी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या सॅकची तपासणी केली असता त्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, एक्सा ब्लेड, हातोडा आढळला. पोलिस चौकशीत त्याने सहा घरफोड्यांची कबुली दिली. आरोपी बाबु मुंगली याच्यावर सोलापूर पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.

पोलिसांनी त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने तसेच मोटरसायक, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरण्यात येणारे साहित्य असा २ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सदरच्या कारवाईत पोलिस निरिक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, संदिप घस्ते, आदिनाथ माने, महंमद मुलाणी, विलास मुंढे, दरीबा बंडगर आदींनी सहभाग होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.