Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातून आखाती देशात गेलेल्या हजारो महिला गायब ?

राज्यातून आखाती देशात गेलेल्या हजारो महिला गायब ? 


राज्यातील मुली आणि महिला गेल्या काही महिनांपासून मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत आहे. यामध्ये 16 ते 35 वयोगटातील महिलांची संख्या जास्त आहे आखाती देशांमध्ये महिलांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. महिलांच्या तपासासाठी महाराष्ट्र पोलीस, गृह विभाग करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोग कार्यालयात नुकतीच सुनावणी घेण्यात आली.गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी राज्यातील मिसिंग सेल, अनेक जिल्ह्यांतील भरोसा सेल हे केवळ कागदावरच आहेत ही वस्तुस्थिती आहे, असा आरोपही चाकणकर यांनी केला. 1 जानेवारी ते 31 मार्चची आकडेवारी पाहिली तर 3594 महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. ही बाब गंभीर आहे. कुणावर टीका करून प्रश्न सुटणार नाही. गृहमंत्र्यांनी यावर तातडीनं काम करावं, असे चाकणकर यांनी म्हटले आहे.
आमिष दाखवून पाठवतात महिलांना आमिष दाखवून परदेशीत पाठवले जाते. काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका भागातील दोन एजंट विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ही मोठी यंत्रणा असल्याने याविरोधात ठोस कारवाई करणे आवश्‍यक आहे. गृह विभागाने पोलिसांना सहभागी करून समिती स्थापन करावी. त्याचा दर 15 दिवसांनी अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना केल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.