Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजऱ्याजवळ १०. ६८ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्तसिंधुदुगर् जिल्ह्यातील पाचजणांना अटक

आजऱ्याजवळ १०. ६८ कोटींची व्हेल माशाची उलटी जप्तसिंधुदुगर् जिल्ह्यातील पाचजणांना अटक


कोल्हापूर :  आजरा तालुक्यातील गवसे ते शेळप रस्त्यावर व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी आलेल्या पाचजणांना अटक करण्यात आली. सवर् संशयित सिंधुदुगर् जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडून १० किलो वजनाची १०.६८ कोटी रूपयांची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. शिवाय एक सफारी आणि मोटारसायकलही जप्त करण्यात आल्याची माहिती आजऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारूगडे यांनी दिल



अकबर याकूब शेख (वय ५१, रा. पिंगोली, मुस्लीमवाडी), शिवम किरण शिंदे (वय २३, रा. कुडाळ), गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३३, रा. केरवडे तफर् मागणगाव), इरफान इसाक मणियार (वय ३६, रा. कुडाळ), फिरोज भावुद्दीन ख्वाजा (वय ५३, रा. कोलगवा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुगर्) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोल्हापूरचे नूतन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी गुन्हेगारांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सहायक निरीक्षक हारूगडे यांचे एक पथक तालुक्यात गस्त घालत होते. 

त्यावेळी गवसे ते शेळप रस्त्यावर काहीजण व्हेल माशाची उलटी विक्री करणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक हारूगडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने तेथे संशयास्पदरित्या उभ्या असलेला सफारी गाडी (क्र. एमएच ०१ बीजी ०५९०), एक दुचाकी (क्र. एमएच ०७ एडी ७७५८) यातील व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यावेळी सफारी गाडीची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये १० किलो ६८७ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी सापडली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून पंचनाम्याने ती जप्त करण्यात आली. नंतर सवर् संशयितांना अटक करण्यात आली. 

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, गडहिंग्लज कॅम्पचे अतिरिक्त अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मागर्दशर्नाखाली आजऱ्याचे सहायक निरीक्षक सुनील हारूगडे, उपनिरीक्षक युवराज जाधव, दत्तात्रय शिंदे, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, प्रदीप देवाडेर्, विकास कांबळे, वनपाल वाळेश न्हावी, वनरक्षक गुरूनाथ नावगेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.