सांगलीत फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, २५० पोती सिमेंट जप्त
सांगली: सांगलीतील एकाच्या जागेत सिमेंट पोती उतरवून घेऊन त्याच्या परवानगीशिवाय ती तेथून चोरून नेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ७७ हजार रूपये किमतीची सिमेंटची २५० पोती जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
अमित सुदाम मखीजा (वय २९, रा. १०० फुटी रस्ता, सांगली), शिवकुमार निंगराज नवलाई (वय ३१, रा. चांदणी चौक, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक डॅ. बसवराज तेली यांनी फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.कामेरी (ता. वाळवा) येथील शहाजी पाटील यांनी याबाबत रविवारी सांगली शहर पोलिस ठाण्यात फियार्द दिली होती. दोघा संशयितांनी पाटील यांच्या सांगलीतील शामरावनगर येथील मोकळ्या जागेत सिमेंटची पोती उतरली होती. त्यानंतर पाटील यांची फसवणूक करत ती पोती अन्यत्र हलवली होती. शहर पोलिसांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास करत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७७ हजार रूपयांची सिमेंटची पोती जप्त करण्यात आली आहेत.
पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मागर्दशर्नाखाली निरीक्षक अभिजित देशमुख, उपनिरीक्षक महादेव पवार, विनायक शिंदे, सचिन शिंदे, झाकीर काझी, अभिजित माळकर, संदीप पाटील, अमित मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.