Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'नास्तिक ' सतीश जारकीहोळी यांनी बसव,बुद्ध, आंबेडकरना स्मरून शपथ घेतली

'नास्तिक ' सतीश जारकीहोळी यांनी बसव,बुद्ध, आंबेडकरना स्मरून शपथ घेतली 


बेळगाव : हिंदू धर्मात अशुभ मानल्या जाणाऱ्या 'राहू काळात उमेदवारी अर्ज भरून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सतीश जारकीहोळी यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरण करुन 'कर्नाटकच्या कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. बेळगाव जिल्ह्यातील अठरापैकी तब्बल ११ जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. यातील यमनम मतदारसंघाचे आमदार, कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना अपेक्षेप्रमाणे पहिल्या टप्प्यातच कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला.

जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडेच जाण्याची शक्यता आहे. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्नशील असताना अनेक पुढारी बुवा-बाबांच्या नादी लागलेले पदोपदी पाहायला मिळतात. मात्र, आपण त्याला अपवाद असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. मानव, बंधुत्व वैदिके या सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील सीमाभागातील ते बिनीचे कार्यकर्ते आहेत. दरवर्षी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम स्मशानभूमीत घेऊन भयमुक्त समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करतात.

बारावीपर्यंत शिकलेले सतीश हे सुरुवातीला धर्मनिरपेक्ष जनता दलाचे प्रमुख कार्यकर्ते होते. 'जद तर्फे दोनदा विधान परिषदेवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत यमकनमर्डी मतदारसंघाची निर्मिती झाली. तेव्हापासून अनुसूचित जमातीसाठी आरक्षित या मतदारसंघात ते सलग चार वेळा निवडून आले आहेत. गेल्या निवडणुकीत एकाही गावात प्रचाराला न जातादेखील ते निवडून आले होते. यापूर्वी त्यांनी उत्पादन शुल्क व लघुउद्योग खात्याच्या मंत्रिपदासह बेळगावच्या पालकमंत्री पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.