Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खाजगी विमानात लोक काय करतात ? एअर होस्टेस केले धक्कादायक सत्य

खाजगी विमानात लोक काय करतात ? एअर होस्टेस केले धक्कादायक सत्य 


जगभरातील अनेक लोक विमानाने प्रवास करतात. मात्र मोठमोठे कलाकार, श्रीमंत लोक त्यांना त्यांचं स्वतःचं खाजगी विमान असतं. ते त्यांच्या सोयीनुसार ते विमान बाहेर काढतात आणि त्याने प्रवास करतात. सामान्यांना नेहमीच हा प्रश्न असतो की हे श्रीमंत लोक एवढ्या मोठ्या खाजगी विमानात काय करत असतील? नुकतंच एका एअर होस्टेसनं याचं उत्तर दिलं आहे. 

तिनं खाजगी विमानात काय गोष्टी चालतात याचं सत्य उघड केलं आहे. एका एअर होस्टेसनं नुकतंच एक्सप्रेस न्युजला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं सांगितलं की, ती खाजगी जेट आणि लक्झरी विमानांमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करते. नाव न सांगता ही माहिती एअर होस्टेसनं दिली आहे. लोक प्रवासासाठी खाजगी जेट बुक करतात. त्यांचे वार्षिक उत्पन कोट्यवधींमध्ये असते.

एअर होस्टेस म्हणाली, बऱ्याचगा तिला प्रवासादरम्यान खूप विचित्र अनुभव आले. तिला काही विचित्र लोकांसोबत प्रवास करावा लागला. एकदी तिनं एका युट्युबरसोबत प्रवास केला. आश्चर्याची बाब म्हणजे युट्युबरही एवढे पैसै कमावतात की ते खाजगी, महागड्या विमानांनी प्रवास करतात. अनेक लोक आपल्या पार्टनरची फसवणूक करतात. तर एकदा अंत्यसंस्काराला जाण्यासाठी जेट बुक केलं होतं. अशा परिस्थिती त्या लोकांनी तिला दारु देण्यास सांगितले. हे ऐकून तिला धक्काच बसला.

कोणाच्या मृत्यूच्या ठिकाणी जातानाही लोक दारु पिऊन जातात

दरम्यान, काही लोक पार्टी आणि भेटीसाठीही याचा वापर करतात जी की चांगली गोष्ट आहे. एअर होस्टनं सांगितलेल्या या गोष्टी सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. विमानातील अशी अनेक सिक्रेट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.