Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर मुकुंद पटवर्धन यांची निवड.

रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळावर मुकुंद पटवर्धन यांची निवड.

सांगलीः  महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ म्हणजेच सेन्सॉर बोर्डा वर  सांगली जिल्ह्यातून तीन वर्षासाठी नाट्य परिषदेचे नुतन संचालक  मुकुंद पटवर्धन यांची निवड  करण्यात आली आहे. 
यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या नाटक अनुदान समितीवर सुद्धा त्यांनी काम केले आहे.  तसेच यावर्षी झालेल्या नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक मतांनी ते विजयी झाले आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन समितीवर सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. 

रंगभूमीवर गेली 35 वर्षे ते सतत कार्यरत आहेत. सुमारे 1500 प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. यामध्ये दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना या सर्वांचा समावेश आहे. गद्य नाट्य प्रयोगाप्रमाणेच संगीत रंगभूमीवर मत्स्यगंधा, संशयकल्लोळ,  मंदारमाला, कट्यार काळजात घुसली इत्यादी प्रयोगांचे सादरीकरण करत करत संगीत ययाती आणि देवयानी या नाटकाचे महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर मिळून 25 प्रयोग त्यांनी सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धेबरोबरच दिल्लीच्या बृहन महाराष्ट्र स्पर्धेतही त्यांना अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. पु.भा. भावे समितीचा नाट्यसेवा पुरस्कार, नाट्य परिषद पुणे शाखेचा सर्वोत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक पुरस्कार हे विशेष पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.