Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मिरजेत घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक; सांगली एलसीबीची कारवाई

मिरजेत घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक; सांगली एलसीबीची कारवाई 

घरफोड्या चोऱ्या करणारी मिरजेतील टोळी जेरबंद : 'एलसीबी' ची कारवाई

सांगली, ता. 6 : मिरज व परिसरात घरफोड्या व चोऱ्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केली. टोळीतील अनिस अल्ताफ सौदागर (वय 26 रा. सुभाषनगर शिंदे हॉलजवळ, मिरज), वसीम अल्लाबक्ष मुल्ला (वय 33 रा. संजय गांधी नगर झोपडपटटी, मिरज) आणि गणेश विष्णू माने (वय 25 मुळ रा. सावर्डे फुटका घाण्याजवळ, ता. तासगांव सध्या रा. शांतीसागर हौसींग सोसायटी, भारतनगर) या तिघांकडून सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.

अधिक माहिती अशी, घरफोडी, चोरी, जबरी चोरी करणाऱ्यांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाले होते. त्यांचे एक पथक मिरज हद्दीत पेट्रोलिंग करीत अंमलदार आर्यन देशिंगकर यांना संशयित गणेश माने, अनिस सौदागर, वसीम मुल्ला या तिघांनी मोबाईल, दुचाकी, गॅस सिलेंडर व सोन्या चांदीचे दागिने चोरी केले असून ते विक्रीसाठी घेवून जाणार असल्याची माहिती मिळाली. मिरज रेल्वे स्टेशन पाठीमागे बसस्थानकाकडे जाणाऱ्या पाय वाटेजवळ ते थांबले असताना सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले.

त्यांच्या ताब्यात असलेल्या दुचाकी व सिलेंडरबाबत विचारणा केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. कसून चौकशी केल्यावर मिरज ते म्हैशाळ रस्त्यावरुन तसेच सुभाषनगर येथून दुचाकी चोरी केली आहे. मालगाव रस्ता रेल्वे ब्रीजजवळ घरफोडी करुन कानातील टॉप्स, कानातील साखळी असे सोन्याचे दागिने व चांदीचा मेकला, चांदीचे ब्रेसलेट, चांदीचे पायातील पैंजण व दोन गॅस सिलेंडर टाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक संदीप शिंदे ,अंमलदार मच्छिंद्र बर्डे, संजय कांबळे, सुधीर गोरे, सुनिल चौधरी, राजु शिरोळकर, संदीप पाटील, राहुल जाधव, अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, अजय बेंदरे, गौतम कांबळे, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते यांच्या पथकाने कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.