या औषधामुळे हजारो नागरिक झाले व्यसनाधीन
नवी दिल्ली, 01 मे : ड्रग्ज अर्थात अंमली पदार्थांचं व्यसन आरोग्यासाठी घातक असतं. हे व्यसन एकदा लागलं तर ते सहजासहजी सुटत नाही. एखाद्या औषधामुळे ड्रग्जचं व्यसन लागू शकतं. अमेरिकेत असा प्रकार घडला आहे. एका औषध निर्मात्या कंपनीने वेदनाशामक गोळी बाजारात आणली. तिचं जोरदार मार्केटिंग केलं. काही कालावधीनंतर हे औषध सदोष असल्याचं दिसून आलं. तोपर्यंत अनेकांना या गोळीची सवय लागली होती. गोळी बंद होताच अनेक जण हेरॉइन, अफिम, फेंटेनाइलचं व्यसन करू लागले. ओव्हरडोसमुळे हजारो लोकांना प्राण गमावावे लागले. अमेरिकेत नशेला महामारीचं स्वरूप प्राप्त झालं आहे.
या स्थितीला औषधनिर्मात्या कंपनीला जबाबदार धरण्यात आलं आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. `दैनिक भास्कर`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. `एकदा हेरॉइनचं व्यसन लागलं तर हळूहळू त्याच्यासोबत नातं तयार होतं. हे व्यसन सोडण्याचा विचार केला तरी तो प्रत्यक्षात येत नाही,` अशा शब्दांत अमेरिकेतल्या एका बेघर आणि नशेने पीडित डॅन नावाच्या व्यक्तीनं हे वास्तव मांडलं आहे. ड्रग्जमुळे व्यसनाधीनतेची ही कहाणी कोणा एका डॅनची नाही तर अमेरिकेत असे लाखो डॅन आहेत. 2022मध्ये एक लाखाहून अधिक अमेरिकी नागरिकांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे. तसंच ड्रग्ज सेवनामुळे अमेरिकी नागरिकांचं सरासरी आयुर्मान दोन वर्षांनी कमी झालं आहे.
जगातल्या सर्वांत शक्तिशाली देशावर ही परिस्थिती ओढवण्यास सॅकलर परिवार जबाबदार आहे असं मानण्यात येतं. हे कुटुंब त्या औषध कंपनीचे मालक आहे, जे औषध घेतल्यानंतर अमेरिकी नागरिकांना ड्रग्जचं व्यसन लागलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अॅब्यूज आणि न्यूयॉर्क टाइम्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 2004पासून 2022पर्यंत ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढती राहिली आहे. अमेरिकेत 2004मध्ये 29,813 जणांचा, 2007मध्ये 36,450 जणांचा 2010मध्ये 41,340 जणांचा, 2013मध्ये 47,055 जणांचा, 2016मध्ये 42,249 जणांचा, 2019मध्ये 70,630 जणांचा, तर 2022मध्ये 1,10,236 जणांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला आहे.1990च्या दशकात अमेरिकी नागरिकांमध्ये अंगदुखीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. या समस्येवर काहीतरी ठोस उपाय मिळावा असं तिथल्या डॉक्टर्सना वाटत होतं. तेव्हा अमेरिकेतल्या फार्मा कंपन्यांमध्ये या समस्येवर औषध तयार करण्यासाठी मोठी स्पर्धा लागली. यात परड्यू नावाची कंपनी आघाडीवर आली. या समस्येवर औषध तयार करण्यासाठी डॉ. रिचर्ड सॅकलर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते या कंपनीचे मालक होते. या कंपनीने जे औषध तयार केलं, त्याचं नाव होतं ऑक्सिकोंटिन.हे औषध तयार केल्यानंतर परड्यू कंपनीने त्याच्या 15 जून 1993 ते 15 एप्रिल 1994 या काळात चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमध्ये गुडघेदुखी आणि सांधेदुखीची समस्या असलेल्या 133 वयस्कर व्यक्तींचा समावेश होता; मात्र ही चाचणी 63 जण पूर्ण करू शकले. यापैकी 82 टक्के जणांना या औषधाचे वेगवेगळे दुष्परिणाम जाणवले. त्याकडे दुर्लक्ष करून, हे औषध दीर्घ काळ वेदनेपासून मुक्ती देऊ शकते, असं कंपनीने सांगितलं.स्वतःची गाडीही सोडावी लागली, व्हायरल त्यानंतर कंपनीच्या मार्केटिंग टीमने हे औषध नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 500 डॉक्टर्सची भेट घेतली. यात 76 टक्के डॉक्टर्सनी या औषधाच्या वापरासाठी होकार दिला आणि हे औषध मार्केटमध्ये दाखल झालं. `न्यूयॉर्क टाइम्स`च्या वृत्तानुसार, रिचर्ड सॅकलर यांनी हे औषध प्रमोट करण्यासाठी जंगी पार्ट्यांचं आयोजन केलं. या कंपनीने जीनिव्हातले प्रसिद्ध डॉक्टर पियरे डेरे यांना वेदनामुक्तीच्या या मोहिमेत सहभागी करून घेतलं.
त्यांनी कंपनीच्या या अभियानाचं कौतुक केलं; मात्र या औषधाचं व्यसन लागू शकतं, अशी शक्यताही बोलून दाखवली. कंपनीने याकडे दुर्लक्ष केलं. हे औषध बाजारात येताच त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. `वॉक्स` या अमेरिकी न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, ज्या व्यक्ती वेदनेमुळे असहाय झाल्या होत्या, त्यांनी या औषधाचा वापर सुरू केला.
त्यानंतर अनेक फार्मा कंपन्या वेदनाशामक औषध निर्मितीच्या व्यवसायात उतरल्या. 2012मध्ये अमेरिकेतल्या डॉक्टर्सनी 25 कोटींहून अधिक रुग्णांना ऑक्सिकोंटिन औषध लिहून दिलं. `या औषधामुळे वेदनाशमन होण्याची खात्री नाही; पण माणसांना याची सवय लागू शकते,` असा इशारा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रा. किथ हॅम्फरिज यांनी दिला होता.
त्यांचा हा इशारा खरा ठरल्याचं दिसून आलं. या औषधाच्या ओव्हरडोसमुळे नागरिकांचा मृत्यू होत असल्याचं दिसताच सरकारने 2013मध्ये या औषधावर बंदी घातली. 2015मध्ये अमेरिकेत या औषधाच्या ओव्हरडोसमुळे 52 हजार जणांचा मृत्यू झाला. रस्ते अपघात किंवा मास शूटिंगमध्ये मृत्यू झालेल्यांच्या आकड्यापेक्षा ही संख्या जास्त होती.1995मध्ये एड्स महामारीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या जास्त असल्याने ही महामारी असल्याचं अधोरेखित झालं आणि तिला `ओपिऑयड संकट` असं नाव दिलं. हे औषध मिळणं बंद झाल्यावर अनेक जण अफीम, हेरॉइन आणि फेंटेनाइलचा वापर करू लागले. यामुळे अमेरिकेतली एक पिढी व्यसनाधीन झाली. ओपिऑयड संकटासाठी अमेरिकेने सॅकलर कुटुंबाला जबाबदार धरलं.कारण हे औषध परड्यू फार्मा कंपनीने तयार केलं होतं आणि ही कंपनी सॅकलर कुटुंबाची होती. या कुटुंबातले अनेक सदस्य 2018पर्यंत कंपनीच्या मंडळावर सदस्य होते. या औषध विक्रीतून त्यांनी मोठा नफा कमावला. त्यानंतर खोटी माहिती देणं आणि औषधाचं सत्य लपवणं यासाठी अमेरिकेतल्या 23 राज्यांत परड्यू फार्माविरोधात 2300 गुन्हे दाखल केले गेले.2019मध्ये सॅकलर कुटुंबाने कंपनी दिवाळखोरीत गेल्याचं घोषित केलं. 2020मध्ये अमेरिकेतल्या एका न्यायालयाने परड्यू फार्माला तिच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी दोषी ठरवलं. न्यायालयाने कंपनीला 14 हजार कोटी रुपये दंड भरण्याचे आदेश दिले. क्वार्ट्ज या अमेरिकी न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, कंपनीने ओपिऑयड संकटासाठी कारणीभूत ठरल्याचं मानून 49 हजार कोटींचा दंड भरला. सरकारने या कंपनीसोबत शेवटी सेटलमेंट केली. त्यानंतर कंपनीविरोधात कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल होणार नाही असं ठरलं.हेही शेवटपर्यंत सॅकलर कुटुंबाने सर्व आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं; मात्र औषधांबाबत सरकारचं धोरण बनवण्यासाठी सूचना देणाऱ्या एनजीओला सॅकलर कुटुंबाने 155 कोटींची देणगी दिल्याचं `एनवायटी`च्या अहवालात उघड झालं. या नॅशनल अकादमी संस्थेने सॅकलर कुटुंबाच्या दबावामुळे सरकारला कोणतीही सूचना दिली नाही का याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
औषध आणि ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे नागरिकांची काय हालत झाली, हे शब्दांत मांडता येणार नाही. ओहोयोमधल्या रॉजर मॅकलेयर्न यांना ओव्हरडोसमुळे त्रास होऊ लागला असता त्यांना पोलिसांनी रुग्णालयात नेले. त्या वेळी त्यांचं शरीर अक्षरशः अशक्त झाले होते. ओहोयोमधली रेचल हॉफमॅन ही महिला सहा महिन्यांची गर्भवती होती. व्यसनामुळे तिच्याकडून मुलांची कस्टडी घेण्यात आली. आता ती व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.