Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भरधाव वेगात असलेली गाडी घसरली आणि थेट दरीत कोसळली.7 जण जागीच ठार

भरधाव वेगात असलेली गाडी घसरली आणि थेट दरीत कोसळली.7 जण जागीच ठार
 

श्री नगर : गाडी स्लीप झाली आणि मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेली गाडी घसरली आणि थेट दरीत कोसळली. या गाडीमधून 10 जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. गाडीचा चुराडा झाला असून गाडी कापून मृतदेह बाहेर काढण्याची वेळ आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाता काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी घटनास्थळावर पाहाणी केली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. ही घटना जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात घडल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातानंतर केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. नुकतेच डीसी किश्तवाड डॉ. देवांश यादव यांच्याशी डांगदुरू धरणाच्या ठिकाणी झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघाताबद्दल बोललो. या घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमींना आवश्यकतेनुसार जिल्हा रुग्णालयात किश्तवाड किंवा जीएमसी डोडा येथे हलवले जात आहे. गरजेनुसार शक्य ती सर्व मदत केली जाईल.

हे सगळे प्रवासी कुठे जात होते आणि गाडी कशी स्लीप झाली याबाबत अजून जास्तीची माहिती मिळू शकली नाही. मात्र पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. तर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांना याबाबत सध्या माहिती देण्याचं काम सुरू आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.