65 महिलांना पोस्टाने पाठवले वापरलेले कंडोम....
एक विचित्र आणि संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांसोबतच नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. गेल्या तीन महिन्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने जवळपास 65 महिलांना पोस्टाने एका पत्रासोबत वापरलेले कंडोम पाठवले आहेत.
ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मेलबर्नच्या पूर्व आणि आग्नेय भागातील पत्त्यांवर राहणाऱ्या 65 महिलांना अचानक पोस्टाने एक पत्र आलं. त्या महिलांनी पत्र घडताच त्यांना धक्काच बसला. त्यांना कोणी तरी निनावी व्यक्तीने पत्रासोबत वापरलेले कंडोम पाठवले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यास सुरु केला आहे. त्यांनी दिलेल्या एका निवेदनात सांगण्यात आलं की, काही महिलांना एकापेक्षा जास्त पत्र मिळाली आहेत. या महिलांना हस्तलिखित पत्र पाठवल्यामुळे या घटनेचा पेच अधिक वाढला आहे. या घटनेमागे अज्ञात व्यक्तीचा कट असल्याचं बोलं जातं आहे. पोलिसांच्या तपासात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या महिलेंचा एकमेकांशी संबंध
पोलीस तपासात ज्या महिलांना या प्रकारचे पत्र मिळाले आहेत. त्या सर्व महिलांचा एकमेकांशी संबंध आहे. त्या सर्व महिला 1999 मध्ये शहरातील किलब्रेडा कॉलेज खासगी मुलींच्या शाळेत शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे या सर्व महिलांच्या घराचा पत्ता त्या व्यक्तीला शाळेच्या जुन्या वार्षिक पुस्तकातून मिळाला संशय पोलिसांना आहे. या घटनेने ऑस्ट्रेलियामध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी अजून त्या व्यक्तीचा शोध लागला नसून त्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, जर कोणाला यासंदर्भात माहिती मिळाली तर त्यांनी त्वरित पोलिसांनी संपर्क साधावा. सध्या मेलबर्नची 'बेसाइड सेक्शुअल ऑफेन्सेस अँड चाइल्ड अब्यूज इन्व्हेस्टिगेशन टीम' कडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पोस्टाने येणाऱ्या पत्राने परिसरातील सर्व महिलांमध्ये भीतीदायक वातावरण आहे.
मला रात्रभर झोप लागली नाही...
जेव्हा त्या महिलेला पत्र मिळालं तिने तिच्या इतर मैत्रिणींना फोन केला. त्यावेळी त्यांनीही असं पत्र मिळालंच सांगितलं. ''या पत्रानंतर मी इतकी अस्वस्थ होती की मला रात्रभर झोप लागली नाही.'' हे अत्यंत घृणास्पद आणि लज्जास्पद कृत्य असून हे ज्याने कोणी केलं आहे. त्याला पोलिसांनी लवकर पकडण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.