आम्हालाही आमदार करा : तहसीलदार, डॉक्टरांसह 600 जणांचे राज्यपालांकडे अर्ज
मुंबई : राज्यात राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या रखडलेल्या असताना या जागांकरता तब्बल 600 अर्ज राज्यपाल कार्यालयाकडे आले असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी मागवलेल्या माहितीमुळे ही बाब उघडकीस आल्याचे पखाले यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना ही माहिती दिली.
पखाले यांनी राज्यपाल कार्यालयाकडे याबद्दल माहिती मागितली होती. त्यावर राज्यपालांच्या कार्यालयाकडून आमदारकीसाठी 600 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये तहसीलदार, डॉक्टर, पीएचडी धारक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती आहे.
राज्यात 2019 साली उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं. त्यानंतर विधान परिषदेच्या राज्यपाल नामिर्देशित 12 जागांकरता नावांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यालयाकडे देण्यात आली. मात्र त्या नावांच्या यादीवर कुठलाही निर्णय झाला नाही. राज्यात सत्तांतर झाल्याने या आमदारांची नियुक्ती अद्याप अनिश्चित मानली जात आहे.तीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप याबाबत कुठलाच निर्णय झालेला नसल्याने अमरावती शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी राज्यपाल कार्यालयाकडे याबाबत माहिती विचारली. त्यामाहिती अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरात आमदारांच्या 12 जागांसाठी राज्यभरातून तब्बल 600 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती राज्यपाल कार्यालयाने अर्जदार पखाले यांना दिली आहे. या अर्जांमध्ये तहसीलदार, डॉक्टर, पीएचडीधारक यांच्यासह समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.