Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अशिष्ट विद्यार्थिनी केले 60 वर्षी दुसरे लग्न ,रूपालीशी

अशिष्ट विद्यार्थिनी केले 60 वर्षी  दुसरे लग्न ,रूपालीशी

गुरुवारी कलकत्ता येथे पार पडलेल्या या लग्नात फक्त त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर आता हे कपल मित्र आणि नातेवाईकांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवणार आहे. आशिष यांच्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर रुपावी बरूआ या आसाममधील फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथील रहिवासी रुपाली या कलकत्ता येथील एका फॅशन स्टोअरच्या मालक आहेत.

‘आयुष्याच्या या टप्प्यावर रुपालीशी लग्न करणे ही एक असामान्य भावना आहे. सकाळी आमचं कोर्ट मॅरेज झालं आणि संध्याकाळी आमचं गेट-टूगेदर होणार आहे,' अस आशिष यांनी नमूद केले, . आपल्या प्रेमकथेबद्दल मीडियाशी बोलताना आशिष म्हणाले, 'अहो, ही खूप मोठी गोष्ट आहे, त्याबद्दल परत कधीतरू बोलू. ' यावर रुपाली म्हणाली, 'आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि आम्ही आमचे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. आमचे लग्न अगदी साधेपणाने व्हावे अशी आम्हा दोघांची इच्छा होती.

रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीसोबत झाले होते. राजोशी एक प्रसिद्ध अभिनेत्री, गायिका आणि नाट्य कलाकार आहेत. आशिष विद्यार्थी यांच्याबद्दल सांगायचे तर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह 11 भाषांमधील 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ते तामिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी भाषेतील चित्रपटांमध्ये दिसले आहेत. ‘बिच्चू’, ‘जिद्दी’, ‘अर्जुन पंडित’, ‘वास्तव’, ‘बादल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. अलीकडेच अभिनेते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर चित्रपट ‘गुडबाय’ मध्ये देखील ते दिसले होते. आशिष विद्यार्थी हे सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतात आणि फूड ब्लॉगिंग देखील करतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.