Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एक्साईजच्या 58 निरीक्षकांच्या बदल्या

एक्साईजच्या 58 निरीक्षकांच्या बदल्या 


मुंबई :  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) राज्यातील सार्वजनिक बदल्या करण्यात बाजी मारली आहे. या विभागातील 58 निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 30 निरीक्षकांच्या विशेष बदल्या करण्यात आल्या आहेत. तर 29 दुय्यम निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. राज्याचे अवर सचिव एस. जी. ढाकणे यांच्या स्वाक्षरीने शुक्रवारी हे आदेश काढण्यात आले आहेत. 

विशेष बदल्यांमध्ये सांगलीतील निरीक्षक अनुपकुमार देशमाने यांची पुण्याला बदली करण्यात आली आहे. गडहिंग्लजचे निरीक्षक मिलिंद गरुड यांची अकलूज येथे बदली करण्यात आली आहे. या विशेष बदल्यांमध्ये एकूण 30 निरीक्षकांचा समावेश आहे. सर्वसाधारण बदल्यांमध्ये पंकज कुंभार यांची नांदेड येथून कोल्हापूर विभागीय उपायुक्त कार्यालयाच्या भरारी पथकाकडे नियुक्ती करण्यात आली आहे. अंकुश मते यांची कागलहुन धुळे येथे तर राजेंद्र दिवसे यांची भंडारा येथून कागल चेक पोस्ट येथे बदली करण्यात आली आहे. वारणानगर कारखान्यातील निरीक्षक अशोक साळोखे यांची इचलकरंजी येथे बदली करण्यात आली आहे.

या विभागातील 29 दुय्यम निरीक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. पुण्यातील बी. आर. पाटील यांची तसेच आर. एम. भापकर यांची पदोन्नतीवर सांगलीत बदली करण्यात आली आहे. पुण्यातील ए. व्ही. घाटगे यांची गडहिंग्लज, एम. एस. चव्हाण यांची सातारा, एम. व्ही. गायकवाड, आर. ए. काटकर, एम. आर. राठोड, एस. ए. पाटील यांची सातारा येथे पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.