महाराष्ट्र होऊ शकतो 56 जिल्ह्याचा...हे 22 जिल्हे प्रस्तावित
मुंबई: भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मराठी भाषिकांचा प्रदेश म्हणून २६ जिल्ह्यांचा महाराष्ट्र १ मे १९६० रोजी अस्तित्वात आला. अनेक जिल्हे हे लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे असल्याने प्रशासकीय कामातील नागरिकांची गैरसोय समोर येऊ लागली. त्यामुळे मोठ्या जिल्ह्यातून नवीन जिल्हा निर्मिती सुरू झाली. मात्र, त्यासाठी २० वर्षांचा कालखंड जावा लागला. त्यानंतर आजपर्यंत राज्यात नवीन १० जिल्ह्यांची भर पडून आपला महाराष्ट्र ३६ जिल्ह्यांचा झाला आहे. असे असले तरी अद्यापही अनेक जिल्ह्यात शेवटच्या गावातून येणाऱ्या नागरिकाला अवघा दिवस खर्ची घालावा लागतो. त्यामुळे २२ जिल्ह्यांची मागणी प्रस्तावित आहे.
सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे.
१० जिल्ह्यांचे बॉम्बे स्टेट
तेव्हा खान्देश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे १० जिल्हे होते. १ मे १९६० : द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन झाले. मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र तर गुजराती भाषिकांसाठी गुजरातची निर्मिती.
प्रारंभीचे २६ जिल्हे
ठाणे, कुलाबा (आताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) हे २६ जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.
१९८१ पासून आतापर्यंत झाले हे १० जिल्हेया जिल्ह्यातून हा जिल्हा तयाररत्नागिरी - सिंधुदुर्ग (१ मे १९८१)छ. संभाजीनगर - जालना (१ मे १९८१)धाराशिव - लातूर (१६ ऑगस्ट १९८२)चंद्रपूर - गडचिरोली (२६ ऑगस्ट १९८२)बृहन्मुंबई - मुंबई उपनगर (१ ऑक्टो. १९९०)अकोला - वाशिम (१ जुलै १९९८)धुळे - नंदुरबार (१ जुलै १९९८)परभणी हिंगोली (१ मे १९९९)भंडारा - गोंदिया (१ मे १९९९)ठाणे - पालघर (१ ऑगस्ट २०१४)आणखी २२ जिल्हे प्रस्तावित((२०१८ मध्ये स्थापन समितीचा प्रस्ताव)या जिल्ह्यातून हे जिल्हे शक्यनाशिक - मालेगाव, कळवणपालघर - जव्हारठाणे - मीरा भाईंदर, कल्याणअहमदनगर - शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूरपुणे - शिवनेरीरायगड - महाडसातारा - माणदेशरत्नागिरी - मानगडबीड - अंबेजोगाईलातूर - उदगीरनांदेड - किनवटजळगाव - भुसावळबुलडाणा - खामगावअमरावती - अचलपूरयवतमाळ - पुसदभंडारा - साकोलीचंद्रपूर - चिमूरगडचिरोली - अहेरी
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.