इन्शुरन्स पॉलिसी घेताय तर सावध रहा; पुण्यात जेष्ठ महिलेला 55 लाखांचा गंडा
पुणे: शहरात ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यादरम्यान पुण्यात एका ज्येष्ठ नागरीक महिलेची ज्येष्ठ महिलेची तब्बल ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. लाईफ पॉलिसी काढून त्याच्यामाध्यमातून मोठा फायदा मिळवून देऊ असे अश्वासन देऊन महिलेचा विश्वास मिळवण्यात आला. तसेच आम्ही बँकेचे लोक आहोत सांगून महिलेला पैसे बँकेत जमा करायला सांगण्यात आले.
या थापांना बळी पडून महिलेने पैसे जमा करण्यास सुरूवात केली. वेळोवेळी ठारविक रक्कम विविध ३६ बँकांमध्ये जमा केली. तसेच पैसे भरल्याची बनावट पावती देखील या चोरट्यांनी त्यांना दिली. हा सगळा प्रकार २०१४ ते २०१९ पर्यंत सुरू होता.आपल्याला पैसे मिळत नाहीयेत आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसांत धाव घेतली. या फ्रकरणी सात मोबाइल धारकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, मात्र यातील आरोपींची खरी नावे तपासानंतर पुढे येतील. पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.