मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी देतो असे सांगून अल्पवयीन मुलीला 50 हजारात विकले
मध्य प्रदेशातील एका सतरा वर्षीय मुलीला ५० हजार रुपयांमध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघाजणांना अटक करण्यात आल्याची माहिती रविवारी पोलिसांनी दिली, यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती ही मुळची मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहे. जबलपूर येथील एका डेअरीमध्ये काम करत असताना तिची ओळख पहलवती बाई आणि सुनील कुशवाह यांच्याशी झाली.
त्यांनी तिला मुंबई येथे चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर या दोघाही आरोपींनी पीडितेला रायसेन येथील पटई गावातील विष्णू कुशवाह नावाच्या व्यक्तीला ५० हजार रुपयात विकले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.