राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष 5 मे ला ठरणार; शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत 5 मे ला बैठक होणार आहे. शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीची 5 मे ला बैठक होईल. या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे.
विशेष म्हणजे निवड समितिची 6 मे ला बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेतली आहे. निवड समितीची बैठक जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल, असं शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेते यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करायला हवं होतं हे मला जाणवत आहे, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. पण विचारुन राजीनामाची घोषणा केली तर विरोध झाला असता, असंही शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची नेमकी भूमिका काय?
शरद पवार यांची राजीनाम्यानंतरची भूमिका समोर आली आहे. पवारांनी एक खंत व्यक्त केली. “६ मेची बैठक ५ मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. मी वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं, असं मला आता जाणवत आहे”, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. “जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला “, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.“१ मे १९६० रोजी मी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. त्यामुळे माझं 1 मे शी वेगळं नातं आहे. मी युवक काँग्रेसच्या बैठकीत भाकरी फिरवण्याचं व्यक्तव्य केलं होतं. मी युवकांची मतं विचारात घेणारा नेता आहे. त्यामुळे तुमच्या मतांचा मी आदर करतो . ग्रामीण भागातील युवक आणि युवतींना मुख्य प्रवाहात आणायचे आहे”, असं शरद पवार म्हणाले आहेत
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.