Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कॉंग्रेस लोकसभेच्या 48 च्या 48 जागा स्वबळावर लढणार

कॉंग्रेस लोकसभेच्या 48 च्या 48 जागा स्वबळावर लढणार 


राज्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये तसंच भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांच्यात आता जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी स्वबळावर लढवण्यासाठी माईंड गेम सुरू आहे. काँग्रेस उपाध्यक्ष तसेच माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 जागांसाठी चाचपणी सुरू केल्याचे संकेत दिले आहेत. यासाठी सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांनी तयारी केली आहे यामुळे काँग्रेस पक्ष वेळ पडल्यास सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देईल असा संकेत डॉक्टर उल्हास पाटील यांनी दिलाय गेल्या लोकसभा निवडणूक वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनच पक्षांची आघाडी होती यामुळे निम्म्या जागा एकमेकांना मिळाल्या होत्या. 

काही जागांची ज्या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकद आहे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने समन्वयाने जागा वाटप झाली होती. त्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी ऐवजी काँग्रेसला उमेदवारी देण्यात आली होती असेच काही मतदारसंघांमध्ये काँग्रेस असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा आदला बदली केली होती मात्र आता आघाडीची महाआघाडी होऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाची एन्ट्री झाल्याने जागा वाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे महाविकास आघाडी च्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून अंतर्गत वाद आहे ऐन लोकसभाच्या जागा वाटपाचा तिढा सुटलाच नाही तर आपल्या पक्षाची ही तयारी रहावी यासाठी काँग्रेस पक्षाने लोकसभेच्या सर्व 48 जागांमध्ये आपली संपूर्ण तयारी सुरू केली आहे अशी माहिती माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे.

डॉक्टर पाटील यांच्या वक्तव्यामुळे जागा वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या जागावाटपावरूनच वाद होण्याची शक्यता आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी डॉ उल्हास पाटील यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती आता रावेर लोकसभा उमेदवारीसाठी स्वतः उमेदवारी करणार नाही तर त्यांची कन्या डॉ केतकी पाटील यांच्यासाठी आग्रही राहणार आहे. यामुळे रावेरच्या जागेसाठी काँग्रेस,शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

सध्या रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे आहेत. भाजपकडून रक्षा खडसेना यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात तसंचं कार्यकर्त्यांमध्ये आहे. एकनाथ खडसे यांच्या पाठोपाठ सून रक्षा खडसे यांनी जर राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर रावेरची जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा करेल अशीही चर्चा आहे. भाजपकडून मंत्री गिरीश महाजन माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे तर काँग्रेसकडून डॉ केतकी पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीला वर्षभर वेळ असला तरी आतापासूनच सर्वच राजकीय पक्षांनी आपापली दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.